राज्यातील ‘त्या’ जाहिरातीने चर्चेला उधान !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ जून २०२३ ।  राज्यात शिंदेंच्या शिवसेनेचे व भाजपची सत्ता असून राज्यातील अनेक वृत्तपत्रात आज एका जाहिरातीने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. कारण ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेकडून करण्यात आली. आतापर्यंत ‘देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र’ अशी जाहिरात पाहयला मिळाली आहे. त्यामुळे राज्यात चांगलेच घमसाम माजले आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

या प्रकरणावर शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटलं की, ‘आम्ही काही वेळापूर्वी सोबत होतो. आम्ही एकत्रित आहोत. या जाहिरातीबाबत काही गैरसमज असल्यास ते दूर करण्याचा प्रयत्न करू. युतीत भांडण लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर जाहिरातीबाबत काही चुका झाल्या असतील तर त्या सुधारल्या जाऊ शकतात’ असं मंत्री दिपक केसरकर यांनी म्हंटलं आहे.

तर वृत्तपत्रामध्ये दिलेल्या जाहिरातीत देवेद्र फडणवीस यांचा फोटो लावण्यात आलेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कुठेतरी कमी टक्केवारी देण्यात आली आहे. या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना दिपक केसरकर म्हणाले कि, ‘हे वक्तव्य चुकीचे आहे. देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मिळून 59 टक्के होतात. 59 टक्के हे विजयी होण्यासाठी खूप आहेत. दोघे एकत्रित आहेत. तर ही टक्केवारी दोघांची आहे. शिंदे आणि फडणवीस हे दोघे भावाभावासारखे काम करतात, दोघ एकत्रित आहेत त्यामुळे विरोधी पक्षांना त्रास होतं असल्याचं दिपक केसरकर यांनी म्हंटलं आहे’.जाहिरात देतांना एखादी चुक होऊ शकते, ती चुक सुधारली जावू शकते. आमच्यामध्ये कुठलेही गैरसमज आणि मतभेद नाहीत असे स्पष्टीकरण मंत्री दिपक केसरकर यांनी दिले आहे. आमच्यामध्ये एक ते दिड तास चर्चा झाली मात्र ती महाराष्ट्राच्या जनतेसाठी कोणत्या योजना राबवायच्या या संदर्भात झाली. श्रेयवादाची लढाई दोन्हीही पक्षांमध्ये अजिबात नसल्याचे केसरकर यांनी सांगितले आहे. ही फुट पाडण्याचा प्रयत्न कोण करतयं हे उघड असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम