कंत्राटी नर्सेसला रिक्त पदांवर सेवेत सामावून घेण्याची संघटनेची मागणी ;आझाद मैदानावर केले धरणे आंदोलन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ मार्च २०२३ ।  राष्ट्रीय ग्रामीण अभियान अंतर्गत कंत्राटी नर्सेसला रिक्त पदांवर शासकीय सेवेत सामावून घेणेसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते नर्सेस युनियन धुळे ( आयटक) यांच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना निवेदन देऊन विविध मागण्या करण्यात आल्या.

मागण्यांकडे दुर्लक्ष केले म्हणून आझाद मैदानावर 13 मार्च पासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन केले. याची दखल घेत आरोग्य मंत्र्यांनी 16 मार्च ला बैठक घेणार असे सांगितले मात्र नंतर सदर बैठक रद्द केली. त्यामुळे नर्सेस युनियन च्या 7-8 पदाधिकारी यांची तब्येत बिघडल्याने त्या आक्रमक झाल्या. अधिवेशनात देखील सदर मागण्या आमदार खासदारांनी मांडल्या, मात्र आरोग्य मंत्र्यांनी बोलावले आणि दिवसभर भेट दिली नाही. त्यानंतर 20 मार्च ला बैठकीचे आश्वासन देण्यात आले. आणि पोलिसांनी दमदाटी करीत गाडीत बसवून सर्व महिला पदाधिकाऱ्यांना आझाद मैदानावर सोडण्यात आले. यावेळी आंदोलनात अध्यक्ष रेश्मा कोकणी, उपाध्यक्ष योगिता देवरे, कविता काकडे, छाया अहिरे, सचिव रुपाली सोनवणे, कोषाध्यक्ष वैशाली वेद्रे, योगिता पवार, कार्याध्यक्ष रत्नमाला ठाकरे, उषा चव्हाण, संपर्क प्रमुख वंदना ओतारी, वासंती पगारे, संघटक नलिनी वळवी, योगिता मोरे, प्रसिद्धी प्रमुख संगीता वाघमोडे, जयश्री सूर्यवंशी यांच्यासह आरोग्यसेविका उपस्थित होत्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम