कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना दिला तो अनोखा केक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ जून २०२३ ।  राज्यातील अनेक जिल्ह्यातून महाराष्ट्र सैनिक मुंबई राज ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या भेटीसाठी जात आहे. तर अनेक कार्यकर्ते त्यांना केक घेवून जात आहे पण याच एका कार्यकर्त्यांने चक्क औरंगजेब अन् मशिदीवरील भोंग्याचा केक भेट दिला. राज ठाकरे यांनी यापूर्वी औरंगजेब आणि मशिदीवरील भोंग्यावरून आवाज उठवला होता. हेच ध्यानात घेत कार्यकर्त्यांनी ही नसती उठाठेव केली.

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्रीपासून त्यांच्या कार्यकर्त्यांन शिवतीर्थावर गर्दी केली होती. शिवाय आज सकाळपासूनही शुभेच्छा देण्यासाठी रांगा लागल्या होत्या. राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी रात्रीपासूनच गर्दी केली होती. आज सकाळीही त्यांनी सपत्नीक हजेरी लावत कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. साडेआठ ते दुपारी बारा या वेळेत आपण शुभेच्छा स्वीकारू असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले होते. मात्र, काही उत्साही कार्यकर्त्यांनी रात्री बाराला शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली. तेव्हा राज यांनी या कार्यकर्त्यांना झापलेही होते.

एका उत्साही कार्यकर्त्याने राज ठाकरे यांना औरंगजेब आणि मशिदीवरील भोंग्याचे चित्र आण त्यावर फुली मारलेला केक भेट दिला. राज यांनी यापूर्वी औरंगजेब आणि मशिदीवरील भोंग्यावरून अनेकदा उघड भूमिका घेतली आहे. यंदा राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आपल्या वाढदिवशी पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका, असे आवाहन केले होते. अगदीच काही आणावे वाटत असेल तर येताना झाडाचे रोप किंवा शैक्षणिक साहित्य आणावे. ही झाडांची रोपे विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ आणि शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ, असे आवाहन केले होते. मात्र, त्यांना किती कार्यकर्त्यांनी अशा भेटवस्तू दिल्या ते अजून समोर आले नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम