बीड जिल्ह्यातील या गावातील ग्रामस्थांनी टाकला मतदानावर बहिष्कार

बातमी शेअर करा...

दैनिक बातमीदार I १८ डिसेंबर २०२२ I राज्याच्या विविध जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. अनेक ठिकाणी मतदानाची प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. मात्र काही ठिकाणी मतदान प्रक्रियेत अडथळा येत असल्याचं पहायला मिळत आहे.
मतदान केंद्र दुसऱ्या ठिकाणी हलवल्यामुळे बीड जिल्ह्यातील मेंगडेवाडीचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यांनी ठिय्या आंदोलन करत मतदानावर बहिष्कार टाकला आहे. यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. ग्रामस्थांचा ठिय्या बीड तालुक्यातील चऱ्हाटा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मेंगडेवाडी आणि जाधववाडी या गावात गेल्या 25 वर्षांपासून मतदानाचे बूथ होते.

मात्र यावर्षी प्रशासनाने अचानक बूथ चऱ्हाटा गावात नेल्याने, मेंगडेवाडी गावातील मतदारांनी गावातच ठिय्या करत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी ग्रामस्थांनी प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम