आज विधिमंडळाच्या सभागृहांत महिला आमदारांचा घुमणार आवाज !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ मार्च २०२३ । आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये राज्याच्या प्रस्तावित महिला धोरणावर चर्चा केली जाणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील महिला सदस्य या धोरणासंदर्भात सूचना मांडतील.

विधानसभा कामकाजात आठ लक्षवेधी सूचना दाखवण्यात आल्या आहेत. त्यातील सात लक्षवेधी मांडण्याची संधी महिला आमदारांना दिली जाणार आहे. आणि यामध्ये यशोमती ठाकूर , देवयानी फरांदे, भारती लव्हेकर, मंदा म्हात्रे , श्वेता महाले , यामिनी जाधव, जयश्री जाधव, सरोज अहिरे यांचा समावेश आहे. महिला आमदारांच्या योग्य सूचनांचा समावेश करून ते धोरण चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मंजूर होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला होता. मात्र त्याला विधिमंडळाची मंजुरी मिळण्याच्या आधीच सरकार कोसळलं होतं.

महिला धोरण महिला दिनी मंजूर व्हावे असा महिला आणि बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रयत्न होता. मात्र, त्यात काही सूचनांचा समावेश करावा, अशी विशेषत: महिला आमदारांची मागणी होती. तसेच, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही तसा आग्रह धरला होता. महिला आमदारांच्या योग्य सूचनांचा समावेश करून ते धोरण चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. महिला दिनाचे औचित्य साधून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम