दै. बातमीदार । १४ जून २०२३ । देशात अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात पण खूप कमी चित्रपटाना हाऊसफुलचे बोर्ड लागलेले दिसत असतात, यात अजून एक चित्रपटाची भर पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ सिनेमाची चर्चा आहे. रामायणावर हा सिनेमा आधारित आहे. ६५०० स्क्रीन्सवर प्रदर्शित होणाऱ्या या मेगा चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे.
या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता त्याच्या अॅडव्हान्स बुकिंगवरूनच दिसून येते. अवघ्या २ दिवसांत चित्रपटाची ४५ हजार तिकिटं विकली गेली आहेत. आदिपुरुषचे अॅडव्हान्स बुकिंग रविवारपासून सुरू झाले. बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, PVR वरून २१,५०० तिकिटं विकली गेली आहेत. त्याच वेळी, आयनॉक्समध्ये या चित्रपटाची १४,५०० तिकिटं विकली गेली आहेत आणि सिनेपोलिसमध्ये ९००० तिकिटं विकली गेली आहेत. या चित्रपटाची एकूण ४५ हजार तिकिटं विकली गेली आहेत. रिपोर्टनुसार ३.५० ते ४ लाख तिकिटांची विक्री होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. अॅडव्हान्स बुकिंगच्या • बाबतीत या चित्रपटाने ‘केजीएफ २’ ला मागे टाकले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम