महाविकास आघाडीच्या सभेआधीच शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ एप्रिल २०२३ ।  राज्यात ठाकरे गटाच्या पाठोपाठ शिंदे गट सभा घेत असल्याने ठाकरे गटाकडून अनेक आरोप शिंदे गटावर होत असतांना आज छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीची सभा होणार आहे. तर दुसरीकडे शिंदे, फडणवीस सरकारच्या वतीनं सावरकर गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

पुन्हा एकदा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे नेते खासदास संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राऊतांवर टीका करताना पुन्हा शिरसाट यांची जीभ घसरल्यचां पहायला मिळालं. नेमकं काय म्हणाले शिरसाट? ‘संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘आम्ही सावरकरांचे साहित्य वाचलं नाही, सावरकर आत्मसात केलेले आहेत. सावरकरांचे साहित्य वाचणाऱ्यांना वाचलेलं बोलावं लागतं. संजय राऊत सारखा बडबबड कणाऱ्या मूर्ख माणसाला हेच उत्तर बरोबर आहे.

संजय राऊत डोक्यावर पडलेला माणूस आहे. त्याला जास्त महत्त्व देऊ नका. रेड्याचं दूध काढणारा हा माणूस आहे, अशा शब्दात संजय शिरसाट यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे’. आज मविआची सभा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची सभा आहे. या सभेमध्ये महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष सहभागी होणार आहेत. या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्य नाना पटलो यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्यानं या सभेकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम