‘कलंक’ शब्द पुन्हा चर्चेत ; नागपुरात लागले बॅनर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ जुलै २०२३ ।  शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसापूर्वी नागपुरात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा ‘कलंक’ असा उल्लेख केला. हाच ‘कलंक’ शब्द पुन्हा चर्चेत आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीकास्त्र डागलंय. भाजपवर त्यांनी कठोर शब्दात टीका केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच वाढदिवस झाला असून त्यानिमित्त नागपूरमध्ये ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. ज्या बॅनरची चर्चा होतेय. त्या बॅनरवर शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात पीक विमा देणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला कलंक की भूषण अशा आशयाचे बॅनर नागपूरमध्ये लावण्यात आले होते. त्यावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. त्यावर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही कोणावरही व्यक्तिगत टीका केली नाही . मात्र भाजप कलंक आहे. जर व्यक्तिगत टीका केली असेल तर ती करण्याच्या कोणाला अधिकार नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम