दै. बातमीदार । २६ मार्च २०२३ । राज्यातील तरुणाईला वेड लावून सोडणारी गौतमी पाटील सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिच्या नृत्याने सर्वांनाच वेड लावले आहे. अनेक कार्यक्रमासाठी गौतमीला लावणी सादर करण्यासाठी बोलवतात. गौतमी पाटीलच्या नृत्याचे व्हिडिओ अनेक ठिकाणी व्हायरल झाले होते, यात अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली आहे. तिच्या डान्सनं तरूणाईला वेड लावलं आहे. तिची एका आदा पाहण्यासाठी तरूण वर्ग वाटेल ते करताना दिसतो. एका तरूणाने देखील गौतमीच्या कार्यक्रमात असं काय केलं आहे, ज्यामुळं सगळीकडं या तरूणाची जोरदार चर्चा रंगली आहे.
अहदननगर जिल्ह्यातील जवळे या ठिकाणी काही तरूणांच्या वाढदिवसानिमित्त गौतमीच्या डान्साचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. बाजारतळावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तरूणांनी तुफान गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी तुफान गर्दी झाल्याने लोकांना बसायला देखील जागा उरली नव्हती त्यामुळे काही उत्साही तरूण गाळ्यांच्य छतावर चडले.
विशेष म्हणजे हे तरूण ज्या पत्र्यांवर डान्स करत होते, ते ग्रामपंचायतीचे गाळे होते. कार्यक्रम भरात आल्यानंतर तरूण देखील भान हरपून नाचू लागले. मग जे व्हायला नको तेच झाले. यातला एक तरूण डायरेक्ट छप्पर फाडके म्हणजे सिमेंटचा पत्रा फोडून डायरेक्ट आत पडला. गाळ्याला यामुळं मोठं भगदाड पडलं आहे. तरूण गाळ्यात पडल्याने जखमी झाला आहे. याशिवाय गाळ्यातील काही सामानाचे नुकसान झाल्याचे देखील समोर आलं आहे. पत्रा फुटल्याने दुकानदाराने ग्रामपंचयतीकडे तक्रार केली आहे. मात्र ग्रामपंचायत आणि आयोजकांनी या प्रकारकडं दुर्लक्ष केलं आहे. गावात मात्र या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. गौतमीच्या डान्सची क्रेझ वाढतचं आहे. सोशल मीडियावर तिचे दररोज कोणते कोणते व्हिडिओ व्हायरल होत असतात.
नुकताच तिच्या एका कार्यक्रमात एका तरूणाने तिच्यासारखाच डान्स करून तिलाच ठक्कर दिली. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हणजे गर्दी आणि राडा जणू सूत्रच बनलं आहे. कोपरगावच्या कोळपेवाडी येथील महेश्वर यात्रेच्या निमित्ताने गौतमीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. या कार्यक्रमात मंचासमोर एका तरुणाने गौतमी सारखा डान्स करण्याचा प्रयत्न करुन गौतमीला टक्कर दिली. हीघघटना ताजी असतातना आता तिचा हा नवीन किस्सा समोर आला आहे. सध्या तिचं पाटलांचा बैलगाडा हे गाणं देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. गौतमी आणि राडा हे समीकरणचं बनलं आहे. अनेकदा तिच्या कार्यक्रमात पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढत आहे. गौतमीचा लवकरच ‘घुंगरू’ नावाचा चित्रपट येतो आहे. या चित्रपटाचे शूटिंग थायलंडमध्ये पार पडले. याशिवाय सोलापूर, माढा, हंपी या ठिकाणीही चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. या चित्रपटाची निर्मिती बाबा गायकवाड यांनी केली आहे. तेच या चित्रपटात गौतमीसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचे म्हटले जाते आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम