केंद्रिय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याकडून मतदारा संघातील तरुणाना अपेक्षा

बातमी शेअर करा...

देशातील 18 वी सार्वत्रिक लोकसभा निवडणुक सन 2024 साठी रावेर लोकसभा मतदार संघातुन सलग तिसऱ्या वेळेस भरघोस मतदानी निवडुन आलेल्या रक्षाताई निखिल खडसे यांचा मोदी मंत्रीमंडळातील पहिल्या विस्तारातच केंद्रिय राज्यमंत्री युवक कल्याण व क्रिडा राज्यमंत्री म्हणून स्थान मिळालेले आहे तसेच केंद्रिय कॅबिनेट युवक कल्याण व क्रिडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया हे गुजरात मधील पोरबंदरचे असून केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार असल्याने या मतदार संघातील पर्यायाने जळगाव जिल्हयाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत.

मतदार संघामध्ये युवक युवती साठी खेळासाठी पोषक असे वातावरण नसल्याने जळगाव जिल्हा हा खेळाच्या बाबतीत फारच मागे आहे. जळगाव जिल्हात जळगाव येथेच जिल्हा क्रिडा संकुल असून तेथे खेळाचा सरावासाठी जागा आहे. परंतु तालुकास्तरावर अजूनही तालुका क्रिडागण हे अपूर्ण अवस्थेत असून योग् सोई सुविधा नसल्याने सरावासाठी अडचणी वाढत आहेत या मतदार संघातील युवकामध्ये भरपूर क्षमता असून देखील योग्य ते मार्गदर्शनाचा अभाव, क्रिडांगणाचा अभाव, यामुळे याभागातील तरुणाई ही मागे पडली आहे.

या भागातील युवक हे क्रिकेट खेळताना दिसून येतात परंतु त्याच वेळी परांपरांगत असलेले भारतीय खेळ कबडी, खो-खो, हॉकी, कुस्ती, आटापाटया, लांब उडी, उंच उडी, भालाफेक, धनुविदया, धावण्याचे टॅक् या सोईसुविधा असलेले क्रिडांगण या भागातील शाळेत सुध्दा उपलब्ध नसल्याने मागे पडले आहे.

भारतात खेलो इंडिया अंतर्गत विद्यार्थ्यांना युवक कल्याण व क्रिडा मंत्रालया मार्फत फारच गाजावाजा झाला परंतु या भागातील फारच कमी विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतलेला दिसून येतो त्यातल्या त्यात नामांकित खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग दिसून आला मात्र त्यात शालेय शिक्षण विभाग, समाजकल्याण विभाग, आदिवासी विकास विभागाच्या शाळातील सहभाग फारच कमी दिसून आलेला आहे.

महाराष्ट्रापेक्षा मागास असलेल्या हरियाना, मणीपुर या राज्यांनी ऐशीयन गेम, कॉमन वेल्थ गेम खेलो इंडिया मध्ये फारच चांगली कामगिरी केलेली आहे परंतु महाराष्ट्र राज्याची

खेळामध्ये असलेली कामगिरी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

क्रिडा मंत्रालयामार्फत गाव स्तरावर क्रिडांगण, व्यायामशाळा, ची आवश्यकता आहे, तालुका क्रिडांगणावर योग्य ती सोईसुविधा करण्यात यावी जेणेकरुन युवतीना सुध्दा

जास्तीत प्रमाणांवर नियमित सरावात सामील होऊ शकतील यासाठी रक्षाताईनी मोठया प्रमाणात निधी आणून मतदार संघातील क्रिडागण, व्यायामशाळा, याचा चेहरामोहरा बदल करावा जेणेकरुन आपल्या जिल्हयातुन ऑल्मपिक, ऐशीयन गेम, कॉमनवेल्थू गेम मध्ये आपले मतदार संघातील खेळाडू पदक आणू शकेल अशी अपेक्षा मतदार संघातुन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम