
घरासमोर पार्क केलेली कार चोरीला, गुन्हा दाखल
भडगाव/प्रतिनिधी
भडगाव शहरातील विवेकानंद नगर येथून घराच्या बाजूला लावलेली मारुती सियाज चोरीला गेल्याची घटना दि. 13 रोजी मध्यरात्री घडली.
शहरातील बाळद रस्त्यावरील विवेकानंद नगरातील रहिवासी महेंद्र रवींद्र अहिरराव यांनी पार्क केलेली पांढऱ्या रंगाची मारुती सियाज गाडी क्रमांक एम एच 19 सी. यू. 5309 ही चारचाकी गाडी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरीस नेली. याप्रकरणी महेंद्र रवींद्र अहिरराव रा. भडगाव यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 315 /2022 भा.द.वी.कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिन्याभरात दुसरी कार चोरी
भडगाव शहरात यापूर्वी महिन्यादीड महिन्यात यशवंत नगर एच. कॉलनी पाचोरा रोड भागातून मारुती ची स्विफ्ट कार चोरी गेल्याची घटना घडली असून, आता ही दुसरी घटना घडल्याने कार मालक, नागरिकांच्या मनात भीती वातावरण निर्माण झाले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम