‘तेव्हा’ राष्ट्रवादीमुळे भाजप सत्तेवर आता हि तसच काही; कॉंग्रेसच्या नेत्याने केले राष्ट्रवादीला टार्गेट

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ ऑक्टोबर २०२२ । एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळं राज्यातलं राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून गेलंय. मविआचं सरकार कोसळून आता शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झालंय, त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा भाजप सत्तेवर आलं आहे. यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 2014 चा दाखला देत राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय.

2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी सरकारचा पाठिंबा काढला आणि महाराष्ट्रातील भाजप सत्तेत येण्यास मदत झाली. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमुळंच फडणवीसांची सत्ता आली, असं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. ते कराड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 2014 मध्ये राज्यात आघाडीचं सरकारचं काम चांगलं होतं. मात्र, तेव्हा राष्ट्रवादीनं अचानकपणे सरकारचा पाठिंबा काढला. त्यावेळी राष्ट्रवादीनं जर हे सरकार पाडलं नसतं, तर पुन्हा आघाडीचंच सरकार सत्तेत आलं असतं. मात्र, तसं झालं नाही आणि याचा भाजपला फायदा झाला. त्यामुळं राज्यात फडणवीसांचं सरकार सत्तेत यायला कोण कारणीभूत आहे, हे सगळ्यांना समजलं, असं म्हणत चव्हाणांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम