…तेव्हा तर फडणवीसांची विकेट गेली ; पवारांचे जोरदार टीकास्त्र !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० जून २०२३ ।  राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेद्र फडणवीस यांनी मिडीयामध्ये नुकताच पहाटेच्या शपथविधीवर गोप्यस्फोट केला असतात. त्यावर आता शरद पवारांनी जोरदार टीकास्त्र फडणवीस यांच्यावर सोडले आहे. पाटणा येथे 17 पक्षांनी एकत्र येवून बैठक घेतली. त्यावेळी मोदी अमेरिकेत होते. तेथून आल्यानंतर त्यांनी बैठकीची माहिती घेतल्यानंतर त्यांची अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत काय होईल. या भीतीने मोदी अशा प्रकारचे विधाने करत आहेत. तर फडणवीसांनी अन्य विधाने करण्यापेक्षा राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुधारावी त्याकडे लक्ष द्यावे, असा हल्ला पवारांनी केला.

अजित पवारांनी माझ्यासोबत शपथ घेतली होती. त्यामागे शरद पवार होते, असे विधान फडणवीसांनी केले. त्यावर शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले. म्हणाले की, गुगली टाकली की नाही मला माहित नाही. पण गुगलीवर फडणवीसांची विकेट गेली, माझी विकेट गेली, असे कोणी कसे सांगणार, असे बोलत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, माझा पाठिंबा होता. मग मी त्यांना नकार दिला. मग त्यांनी चोरून शपथ का घेतली. दुसरीकडे ही मी गुगली टाकली होती असे लोक म्हणतात, पण मला माहित नाही ही गुगली आहे की नाही, पण या गुगलीवर फडणवीसांची विकेट पडली. आणि विकेट पडलेला माणूस त्याच्या बचावासाठी असे विधान करत असतो. पण राजकारणात विकेट घ्यावीच लागते, असे मत व्यक्त करत पवारांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली.

शरद पवार पुढे म्हणाले की, बैठक झाली, भूमीका बदलली असा आरोप फडणवीस करत आहेत. परंतू मी 2014 च्या निवडणूकीनंतर जाहीर बोललो होतो. राष्ट्रवादी तुम्हाला बाहेरून पाठिंबा देईल. मग असे चोरून कारनामे करण्याची गरज का होती. दोन दिवसांत सत्ता का गेली. यातून एक गोष्ट अगदी सत्य होते की, सत्तेपासून आपण दूर राहू शकत नाही. सत्तेसाठी माणूस कुठेही जाऊ शकतो. असे अगदी स्पष्ट होते. सत्तेशिवाय अशा लोकांना करमत नाही.

शरद पवार म्हणाले की, राज्यात पुणे, ठाणे, सोलापूर या सारख्या शहरात एकूण 2458 महिला, मुली बेपत्ता आहेत. हा आकडा गेल्या सहा महिन्यातील आहे. तसेच बुलढाणा, वाशिम, अमरावती, रायगड, अमरावती, जळगाव, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया य अशा पोलिस अधीक्षक ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या 14 जिल्ह्यामध्ये 23 जानेवारी ते 23 मे या काळात 4,431 मुली महिला बेपत्ता झाल्या आहेत. तर गेल्या 2022-23 मे अखेर या दीड वर्षांच्या काळात एकंदरीत 6,989 मुली बेपत्ता आहेत. त्यांना शोधणार कधी, राज्याच्या गृहमंत्र्यांनी या बघिणींच्या सुरक्षेसाठी व बेपत्ता झाल्यांचा शोघ घेऊन याची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. अन्य विधाने करण्यापेक्षा त्यांनी महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे म्हणत त्यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला.
देशाच्या पंतप्रधानांनी काही गोष्टी सांगितल्या. समान नागरी कायदा, त्याचे म्हणणे आहे की, देशात दोन वेगवेगळे मत कसे असू शकतात. केंद्र सरकारने लॉ कमिशन यांच्याकडे हा विषय सोपवला. नऊशे प्रस्ताव आलेले आहेत. या प्रस्तावात काय म्हटले ह्याची माहिती मला नाही. किंवा लॉ कमिशनने देखील तसे मांडले नाही. ज्याअर्थी ही जबाबदार संस्था काम करते, प्रस्ताव मागते, त्यांच्यात काय तरी असावे. पण संस्था उघडपणे काही माहित देत नाही. दुसरीकडे समान नागरी कायदा मध्ये शिख, ख्रिश्चन, जैन यांचे काय होणार आहे. यात शिख समाजातील लोकांचे वेगळे मत आहे, अशी माहिती समोर आले आहे. त्यामुळे त्यांचा विचार केलाशिवाय निर्णय घेणे योग्य ठरणार नाही.

मोदींनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल काल केलेले वक्तव्य अशोभनीय आहे. संसदेच्या सदस्याविषयी पंतप्रधानांनी असं मत व्यक्त करणं योग्य नाही. कारण या संस्था आहेत. मी पंतप्रधानांवर व्यक्तिगत टीका करत नाही, कारण ती संस्था आहे. संस्थांची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. अशावेळी संसदीय सदस्य हीदेखील संस्था आहे हे लक्षात घेऊन सन्मान ठेवला पाहिजे,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.

देशातील चित्र, बघितली सद्याची राज्यकर्त्यांची नाराजी, अस्वस्थता याच्यापासून लक्ष दूर करण्यासाठी त्यासाठी मोदींकडून असे विधान केले जात आहेत. कारण नॉर्थ इस्ट राज्य, केरळ पासून ते हिमाचलपर्यंत आजचा सत्ताधारी पक्ष यांचा लोकमताचा पाठिंबा हे राज्यपातळीवर हे पाहणे काय गरजेचे आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंधप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, पश्चिम बंगाल हे देशातील राज्यातील भाजपची सत्ता नाही. दुसरीकडे गोव्यात कॉंग्रेस फोडले, मध्यप्रदेश कॉंग्रेसचे आमदार फोडले तर महाराष्ट्रात शिंदेंचे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे गुजरात, उत्तरप्रदेश, आसाम, नॉर्थ इस्ट छोटी राज्य सोडून दिली तर अन्य ठिकाणी भाजपची सत्ता नाही. त्यामुळे त्यांना अस्वस्थता वाढली आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम