…तर गुवाहाटीला जायची वेळ आली नसती ; बच्च्चू कडू !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ जुलै २०२३ ।  राज्यात गेल्या अनेक दिवसापासून मंत्री पदाबाबत मोठ मोठे विधान करणारे व मंत्रीपदामुळे नाराज असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. याबाबत खुद्द बच्चू कडू यांनीही अनेकदा सूचक विधानं करून चर्चेची राळ उडवून दिली होती. अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका सविस्तर मांडली आहे. यावेळी गेल्या अर्ध्या तासात मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वारंवार फोन आल्याचंही सांगितलं.

महाविकास आघडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंकडे आम्ही दोन आमदार गेलो. त्यांनी आमच्याकडे स्वत: फोन करून पाठिंबा मागितला. त्यावेळी आम्ही पाठिंबा दिला. त्यानंतर बऱ्याचदा इतर पक्षांकडून आम्हाला आमिषं आली. पण आम्ही आमच्या पाठिंब्यावर ठाम राहिलो. तसेच, उद्धव ठाकरेही दिलेल्या शब्दावर ठाम राहिले आणि मी राज्यमंत्री झालो. पण त्यानंतर राज्यात नवीन सत्तासमीकरणं जुळायला लागली. आम्ही उद्धव ठाकरेंना दिव्यांग मंत्रालयासाठी भेटत होतो. तेव्हा दिव्यांग मंत्रालय झालं असतं, तर गुवाहाटीला जायची वेळ आली नसती. पण एकनाथ शिंदेंनी दिव्यांग मंत्रालय तयार केलं. माझ्यासाठी ही आयुष्यातली सर्वात मोठी घटना आहे. मी गुवाहाटीला जाण्यामुळे या देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय अस्तित्वात आलं. त्यासाठी मी वैयक्तिक पातळीवर आयुष्यभर एकनाथ शिंदेंचे आभार मानत राहीन.

पण एकंदरीत सत्ता, पैसा आणि पुन्हा सत्ता या बदलत्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला आहे. सगळं काही पदासाठी नसतं. काही लोक म्हणतात की तुम्हाला आता पद मिळणार नाही वगैरे. मी त्याची पर्वा करत नाही. आमची भूमिका ठाम आहे. आम्ही इथून पुढे दिव्यांगांसाठी, शहीद परिवारांसाठी काम करणार आहे. त्यामुळे मी आज मंत्रीपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो. पण मुख्यमंत्री अर्ध्या तासापासून खूप फोन करत आहेत. त्यांनी त्यांना भेटल्यानंतर निर्णय घेण्यासंदर्भात विनंती केली आहे. त्यामुळे मी त्यांची विनंती म्हणून आज दावा सोडण्याचा निर्णय १८ तारखेपर्यंत पुढे ढकलला आहे. त्यांनी १७ तारखेला भेटण्यासाठी विनंती केली आहे. त्यानंतर १८ तारखेला तुम्हाला हवा तो निर्णय घ्या असं ते म्हणाले आहेत. त्यानुसार मी १८ तारखेला माझा निर्णय जाहीर करेन.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम