…तर ही वेळ आली नसती ; आंबेडकरांची भिडेबाबत मोठे विधान !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३१ जुलै २०२३ | राज्यात गेल्या आठ दिवसापासून शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी उर्फ मनोहर भिडे हे सातत्याने देशातील महापुरुषांचे आक्षेपार्ह वक्तव्य करीत आहे. भिडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त होवू लागल्या आहेत. या वक्तव्याचे पावसाळी अधिवेशनात देखील पडसाद उमटले होते त्यानंतर माजी मुख्यमंत्री चव्हाण यांना धमकी देखील आली होती. संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने मनोहर कुलकर्णीचा वेळीच बंदोबस्त केला असता तर आता ही वेळ आली नसती, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून ट्वीट करत टीकास्र सोडलं. प्रकाश आंबेडकर ट्वीटमध्ये म्हणाले, “भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेने महात्मा गांधी यांच्याविषयी केलेलं वक्तव्य अत्यंत निषेधार्थ आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने मनोहर कुलकर्णीचा त्याचवेळी बंदोबस्त केला असता, तर ही वेळ आली नसती.”

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम