शिंदे सरकारमध्ये तरुणांना नोकऱ्या नाही ; आदित्यचा घणाघात !
दै. बातमीदार । ६ जानेवारी २०२३ राज्यात नवे सरकार हे तरुणांना नोकरी देणार यासारखे विविध प्रकल्प राज्यात आणणार यासाठी आले असल्याचे नेहमी शिंदे गटातील मंत्र्यासह आमदार बोलत असतात. त्यावर आज ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला चांगलेच धारेवर धरले.
राज्यातील बेरोजगारी, महिलांचे प्रश्न आणि विविध समस्यांवरून उद्धव ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरलं. तसेच त्यांनी यावेळी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका देखिल केली. शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यातील तरूण बेकारीत आहेत. त्यांना नोकऱ्या नाहीत. महिलांचे प्रश्न त्यांची आवाज ऐकली जात नाही. शेतकऱ्यांना देखिल असच केलं जात आहे. आणि ऐकतात ते फक्त दिल्लीचं आणि हेच दु :ख आहे महाराष्ट्राचं.
तसेच राज्यातील विविध प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात विविध ठिकाणी फिरताना नवीन गुंतवणूक आलेली दिसत नाही. तर औरंगजेबवरून देख्ल टीका करताना, राज्यात योगीजी येऊन गेले, मी योगीजी बोलतोय औरंगजेबजी नाही. कारण असं त्यांचे नेते बोलतात, असाही टोला त्यांनी फडणवीस आणि भाजपला लगावला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम