राज्यात पावसाची शक्यता कायम !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २२ ऑक्टोबर २०२३

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील विविध भागांत पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. त्याचबरोबर कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र त्याच वेळी राज्याच्या मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश या भागातील तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तीव्र होण्याच्या शक्यतेमुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता असल्याने कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील २४ तासांत सोलापूर आणि अकोल्यामध्ये तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम