कुठलाही लाठीचार्ज नाहीच ; मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ एप्रिल २०२३ ।  राज्यातील राजकारणात विरोधकांनी पुन्हा एकदा सत्ताधारीना घेराव घातला आहे. राज्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू असतांनाच स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. यावेळी अनेक नागरिकांनी पोलिसांना बाजूला करत आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वातावरण चांगलचं तापलं. यावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडया फोडून आंदोलन कर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील करण्यात आला. अशी माहिती समोर आली आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी कोणताही लाठीचार्ज झाला नसल्याचे म्हटलं आहे.

बारसूतील गोंधळानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलकांवर लाठीचार्ज झाला नसल्याचे सांगत आंदोलनात बाहेरच्या लोकांचाही समावेश होता असा दावा केला आहे. बारसूत सध्या शांतता आहे. बारसूत कोणातही लाठीचार्ज केला नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. आंदोलनात बाहेरच्या लोकांचाही समावेश आहे. बाहेरचे काही लोक आंदोलनस्थळी आल्याची माहिती मिळाली आहे. शेतकऱ्यांवर जबरदस्ती करणार नाही. असं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
बारसूतील लोकांचा गैरसमज दुर करणार. स्थानिकांच्या समंतीनेच हा प्रकल्प पुढे नेणार. जोरजबरदस्तीने हा प्रकल्प करणार नाही. ७० टक्के लोक रिफायनरी प्रकल्पाच्या बाजून आहेत.

स्थानिकांनी शांतता राखावी. रिफायनरी झाल्यास स्थानिकांना रोजगार मिळाणार. त्यांना प्रकल्पाचा फायदा समजावून सांगणार. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरु असलेले आंदोलन शुक्रवारी चिघळलं. पोलीस आमच्या अंगावर धावून आले. वृद्ध महिला आंदोलकांवरही लाठीमार करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आंदोलकावर लाठीमार करण्याचा इशारा देणाऱ्या पोलिसांना महिला आंदोलकांनी सुनावलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल होतोय. “ही जमीन तुमच्या बापाची नाही. ही आमची नाही”, असं महिला आंदोलकाने म्हटलंय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम