विरोध पक्ष नेत्यासाठी दालन नाही !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ जुलै २०२३ ।  राज्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट सत्तेत आल्याने सत्ताधारी वरचढ ठरणार, की विरोधक वरचढ ठरणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक गोष्टींवरून कोंडीत पकडू शकतात. राज्यात पुरेसा पाऊस न झाल्याने अडचणीत आलेला शेतकरी, महागाई यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

तर राष्ट्रवादीतील फूटीमूळे आता विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये राष्ट्रवादी असणार आहे. अशातच राष्ट्रवादीतील दोन गटामुळे दालनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विधानसभा विरोधी पक्ष नेत्याला सध्या दालन नाहीये. विधान भवनातील विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी तेच केबिन सध्या कायम ठेवले आहे. विरोधी पक्ष नेते पदाचे दालन हेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दालन झाले आहे. त्यामुळे विरोध पक्ष नेत्यासाठी दालन कोणते हा प्रश्न निर्माण झाला आहे.

विधानसभा विरोधी पक्ष नेत्याला सध्या दालनाप्रमाणेच विधिमंडळातील राष्ट्रवादी कार्यालयात अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अजित पवार गट आणि शरद पवार गट याना वेगळेवेगळे कार्यालय देण्यात आले नाहीत. पक्ष कार्यालय पहिलेच असून त्यात शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. तर दरवाजावर विधानसभा प्रतोद अनिल पाटिल यांच्या नावाची पाटी आहे. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर काही आमदारांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. तर काही आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. अशातच विधिमंडळातील राष्ट्रवादी कार्यालयात अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांना वेगळेवेगळे कार्यालय देण्यात आले नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजूचे नेते एकत्रित बसणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम