गौतमीच्या कार्यक्रमात बसायला जागा नसल्याने तुफान राडा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ डिसेंबर २०२२ । सध्या राज्यात व सोशल मिडीयावर नेहमी चर्चेत असलेली लावणी कलावंत गौतमी पाटील आहे. तिच्या सर्वत्र कार्यक्रमांना तूफान गर्दी होत असून या कार्यक्रमावर राजकीय वाद सुद्धा ओढवला गेला होता. तिच्या कार्यक्रमाना बंदी आणावी याची सुद्धा मागणी राज्यात व्हायला लागली होती. आपल्या दिलखेचक अदा आणि डान्समुळे तरुणाईसह इतर वयोवर्गातील लोक तिच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात.

काही दिवसांपूर्वी सांगली येथील बेडगमध्ये लोकांनी सरकारी शाळेचे कौलारू छत फोडले. झाडे पाडली. गौतमीच्या एका कार्यक्रमादरम्यान एक मृतदेह आढळून आला होता त्यामुळे तिच्या कार्यक्रमावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान आताही गौतमीच्या कार्यक्रमांना तुफ्फान होत आहे. काल सोलापूर जिल्ह्यातील नातेपुतेमध्ये तिच्या कार्यक्रमाला इतकी गर्दी झाली होती. बसायला जागा नव्हती त्यामुळे तरुणांनी कार्यक्रमात राडाच घातला. तरुणांनी खुर्च्या मोडल्या अन् बॅरिकेटिंग तोडून स्टेजपर्यंत गेले. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे. सोलापूरमधील नातेपुते गावात गौतमीच्या कार्यक्रमाला अबाल वृद्धांसह तरुणांची प्रचंड गर्दी केली. या कार्यक्रमात प्रेक्षकांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवल्या होत्या. पण खुर्च्या कमी आणि गर्दी जास्त झाल्यामुळे बसायला जागाच उरली नसल्यामुळे तरुणांनी खुर्च्या फेकल्या आणि जागा मिळेल तिथे उभं राहुन कार्यक्रमाचा आनंद घेतला. गर्दीला आवरण्यासाठी कार्यक्रमस्थळी बॅरिकेटिंग लावण्यात आले होते. तरुणांनी बॅरिकेटींग तोडून आत प्रवेश केला. यावरून गर्दी किती होती याचा अंदाज येईल. गौतमीचा डान्स सुरू असतानाच हा गोंधळ सुरू झाला.

गौतमीच्या डान्सवर, गाण्याच्या ओळींवर आणि तिच्या दिलखेच अदांवर नातेपुतेकर थिरकले. यावेळी कोणी फेटे उडवले, टोपी उडवली हे असं चित्र तिच्या कार्यक्रमात दिसून आलं. दरम्यान, कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी लोकांना वेळीच सावरण्यास सुरुवात केली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम