तुमच्याकडे येण्याचा प्रश्‍नच नाही, पण तुम्हाला सत्तेतून खाली उतरवू, पवार यांचे मोदींना थेट आव्हान

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ मे २०२४ । ‘पं. नेहरू स्वातंत्र्यासाठी १३ वर्ष तुरुंगात राहिले, पाकीस्तानला धडा शिकविणाऱ्या इंदिरा गांधी यांची हत्या झाली. राजीव गांधी यांनी देशासाठी प्राण दिले. नेहरू गांधी कुटुंबाने देशासाठी सर्वस्व दिले, त्याच कुटुंबातील राहूल गांधी यांची तुम्ही टिंगलटवाळी करता? गांधी कुटुंबीयांनी देशासाठी योगदान दिले, तसे तुम्ही देशासाठी काय योगदान दिले?’ अशी घणाघाती टीका करत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. तर, ‘स्वातंत्र्य, देशाचे ऐक्‍य, विचारधारा नसलेल्या पक्षात आम्ही येण्याचा प्रश्‍नच नाही, परंतु तुम्हाला सत्तेतून खाली उतरवू’ असे थेट आव्हानही त्यांनी दिले.

“…तेव्हापासूनच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिरुर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघाच्यावतीने अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यात आली. यावेळी कॉंग्रेस नेते विश्‍वजीत कदम, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व माजी आमदार महादेव बाबर, जगन्नाथ शेवाळे, प्रकाश म्हस्के, माजी आ. ऍड. जयदेव गायकवाड, अंकुश काकडे, विजय देशमुख राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह कम्युनिस्ट पक्ष, आप पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

तामिळनाडूची निवडणुक एका दिवसात, पण महाराष्ट्रासाठी सात टप्पे कशासाठी? असा प्रश्‍न उपस्थित करत पवार यांनी निवडणुक आयोगाच्या प्रक्रियेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना पवार म्हणाले, ‘पूर्वी पं.जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांची संपूर्ण राज्यासाठी फक्त एकच सभा रेसकोर्सला झाली.

परंतू आता, देशाच्या पंतप्रधानांवर एका राज्यात एका दिवशी सात-आठ ठिकाणी सभा घ्यायची वेळ आली आहे. इतक्‍या सभा घेऊन योग्य परिणाम होत नाही आणि शासनावर दबाव टाकून निवडणुकीचे निकाल वेगळे लागतील, यासाठी खबरदारी म्हणून ते वारंवार सभा घेत आहेत का? याचे उत्तर त्यांनी द्यावे. पूर्वी इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंहराव, मनमोहनसिंग, अटलबिहारी वाजपेयी अशा पंतप्रधानांच्या भाषणात देशाला पुढे नेण्याचा विचार असे. आताचे पंतप्रधान धोरणांवर बोलण्यापेक्षा व्यक्तीगत टीकेला प्राधान्य देत आहेत.’

स्मिताताई वाघ व क्षाताई खडसे यांना मतदान देऊन मोदीजींचे हात बळकट करु – सुरेशदादा जैन

कदम म्हणाले, ‘शेतकरी, गरीब, कष्टकऱ्यांचे मोदी सरकारला देणेघेणे नाही. महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात चांगले काम केले असताना, भाजपने शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडली. महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय गुजरातमध्ये पळवून नेले.महागाई, जातीधर्मामधील द्वेष कमी करण्यासाठी इंडिया महाविकास आघाडीवर विश्‍वास ठेवून मतदान करा.’

निवडणुकीपूर्वी मध्यरात्री पीडीसीसी बॅंक उघडी कशी?

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुक झाली. त्यावेळी एका ठिकाणी रात्री दोन वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची शाखा उघडी होती. मतदानाच्या आदल्या मध्यरात्री बॅंक उघडी असते, 30-40 लोक येत-जात असतात. तिथे व्यवहार सुरू होता. महाराष्ट्रात असे कधी घडले नाही. यावेळी घडले, कारण यावेळी निवडणुक प्रक्रिया स्वच्छ व शुद्ध होती का? अशी शंका येऊ लागली असल्याचे पवार यांनी आवर्जून नमूद केले.

पवार म्हणाले,

– भाजपकडे १० वर्ष सत्ता, मग कॉंग्रेसवर टीका का?

– महिलांचे दागिने, मंगळसुत्र अशा विषयांवर कुठलाही पक्ष बोललेला नाही

– असत्य मुद्दे मांडून व्यक्तीगत टीका करण्यावर मोदींचा भर

– सत्तेचा, अधिकारांचा गैरवापर हे यांचे वैशिष्ट्ये

– मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याचा कुठला प्रकार आहे.

– देशवासीयांनी इंग्रजांना घालविले, हुकुमशाही देखील घालवू.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम