म्हातारी मेल्याचे दुःख नाही ; राज ठाकरेंचा घणाघात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ फेब्रुवारी २०२३ । कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीदिनी आज मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त पनवेल येथे राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. मुलाखतकाराने यावेळी राज ठाकरे यांना महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर प्रश्न विचारला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक आमदार आहे. त्यांनी पक्षावर दावा सांगितला तर, यावर राज ठाकरे यांनी खुसखुशीत भाष्य केले. ते म्हणाले की, म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो आहे. महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, त्यावर सविस्तर गुढीपाडव्याच्या सभेत बोलणार आहे.

सध्या कुठला आमदार कुठल्या पक्षात आहे हेच कळत नाही. पूर्वी सगळ्या गोष्टी आमने-सामने व्हायच्या. असा महाराष्ट्र कधीही नव्हता. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. साऱ्या राजकीय परिस्थितीवर 22 मार्चला गुढीपाडव्याच्या सभेत सिनेमा दाखवणार आहे, असा इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी दिला. त्यामुळे आता या सभेत ते काय बोलणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. राज ठाकरे पुढे म्हणाले की, असा महाराष्ट्र कधीही नव्हता. पूर्वी सगळ्या गोष्टी आमने-सामने असायच्या. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणासाठी विधानभवनात गेलो होतो. त्यावेळी सगळे बसले होते. मला कळतच नव्हते कोण कोणत्या पक्षातला. सध्या कोणी आमदार आला की कुठल्या पक्षाचा हे विचारावे लागते. मला राजू पाटीलला ही विचारून पाहायचे आहे. पक्ष घेता का म्हणून? दिवसरात्र आम्ही बरनॉल लावत असतो. आमचे जे जळते आहे, ते तुम्हाला कळणार नाही.

राज ठाकरे म्हणाले की, मी आता लतादीदींचे पुस्तक करतोय. त्यांच्या वाढदिवशी हे पुस्तक आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात फोटोबायोग्राफी नाही. या पुस्तकाबद्दल नंतर सांगेन, असे ते म्हणाले. मराठा दैनिकाचे नाव आणि हक्क घेऊन ठेवलेत का, असा प्रश्न विचारला असता राज म्हणाले की, मी हक्क मागायला गेलो होते. मात्र, त्यांनी दिले नाहीत.

राज ठाकरे म्हणाले की, सध्या वर्तमानपत्र मीच वाचत नाही. चॅनल, वर्तमानपत्रे जाहिरातीवर चालतात. वर्तमापत्र काढण्याचे आता बघू पुढे. मराठी नियतकालिके बंद पडत असल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. मराठी माणसांनी मोठ्या प्रमाणात वाचन वाढवले पाहिजे. वर्तमानपत्रे, मासिक, साप्ताहिके जगवली पाहिजे. त्या लोकांनीही तसा खुराक दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
सध्या सगळ्या गोष्टी मोबाइलवर मिळत आहेत. मी खरेच सांगतो. मी खूप वाचतो-बिचतो नाही. मात्र, वाचले पाहिजे. नाही तर विचारांना तोकडेपणा येतो. मुलांशी बोलताना त्यांना आपल्या आई-वडिलांकडे विचारांचा तोकडेपणा आहे, असे कळले की ते बाहेर शोधतात, असे निरीक्षणही राज ठाकरे यांनी नोंदवले. राज ठाकरे पुढे म्हणाले की, तुमची मुळात ओळख काय? मी कोणय? तुम्ही कोण आहात? तर तुम्ही मराठी आहात. मराठी म्हणजे कोण? तर मराठी भाषा बोलणारा व्यक्ती आहे. भाषा तुमची ओळख असते. त्यामुळे तुम्ही जगात ओळखले जाता. मी फ्रान्समध्ये राहतो. त्याला अर्थ नाही. मला फ्रेंच बोलता आले पाहिजे, असे उदाहरणही त्यांनी दिले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम