राष्ट्रवादीत फुट नाहीच ; शरद पवारांनी केल मान्य !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २५ ऑगस्ट २०२३ | राज्यातील एकनाथ शिंदे व फडणवीस यांच्यासोबत सत्तेत अजित पवार सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली होती. मात्र पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली नसून अजित पवार आमचेच नेते आहेत असं वक्तव्य केलं, यामुळे संभ्रम निर्णाण झाला आहे. आता यावर शरद पवार यांंनी देखील याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

सुप्रिया सुळे अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत असं म्हणतात यावर शरद पवार म्हणाले की- आहेतच, त्यात काही वादच नाही. फूट पडणे याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी होते, जर पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देशपातळीवर, आज तशी स्थिती येथे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला, वेगळी भूमिका घेतली लोकशाहीमध्ये तोत्यांचा अधिकार आहे. वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणण्याचं काही कारण नाही हा त्यांचा निर्णय आहे असे शरद पवार म्हणाले.

राज्यात वेगवेगळ्या शहरात सभा घेतल्या जात असतानाच अजित पवार यांच्याकडून देखील उत्तर सभांचे आयोजन करण्यात येत आहे. बीडमध्ये देखील अजित पवार सभा घेणार असल्याबद्दल शरद पवारांना विचारले असता, लोकशाहीत कोणालीही सभा घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्याची चिंता करण्याचा काम नाही. आनंद आहे, लोक आपली भूमिका लोकांच्या समोर मांडायला पुढे येत आहेत. यातलं सत्य जनतेला कळेल. कोणीही जाहीर सभा घेऊन आपली भूमिका मांडत असेल तर मी त्याचं स्वागत करतो असे शरद पवार म्हणाले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा पक्षबांधणीला सुरूवात केली आहे. शरद पवार यांच्या बीडमधील सभेनंतर आज (२५ ऑगस्ट) कोल्हापूर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम