राष्ट्रवादीत देखील होणार कार्यध्यक्षापद ; प्रदेशध्यक्षांची माहिती !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ मे २०२३ ।  राज्यात गेल्या दोन दिवसापासून राष्ट्रवादीच्या पक्षाच्या अध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा असतांना आता त्यावर पडदा पडला आहे. पण यात आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजीनाम्यासह कार्याध्यक्षपदाचीही चर्चा राजकीय गोटात जोरदार सुरु आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांनी माहिती दिली.

आज राष्ट्रवादीच्या सदस्या समितीची बैठक पार पडली. यावेळी शरद पवारांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या सदस्य समितीनं फेटाळला. आता सर्वांचं लक्ष शरद पवार काय निर्णय घेणार याकडे लागलं आहे. अशातच कार्याध्यक्षपदाचीदेखील चर्चा पाहायला मिळत आहे. दरम्यान, जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यध्यक्षापदाचा प्रस्तावासंदर्भात विचारले. असता त्यांनी नाही नाही असा दोनदा उल्लेख करत शरद पवार यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्याचे म्हटले आहे.

शरद पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत अध्यक्ष पदावरुन निवृत्त होऊ नये. त्यांनी त्यांच्या जोडीला किंवा त्यांचं काम पाहण्यासाठी कार्याध्यक्ष नेमावा, असं मत राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी व्यक्त केलं होतं. तसेच, शरद पवार यांनी अध्यक्षपदी कायम राहून पक्षात कार्याध्यक्ष पद निर्माण करावं व या पदावर त्यांच्या संमतीनं एखाद्या नेत्याची नेमणूक करावी, असा प्रस्तावही नेत्यांनी दिला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात कार्याध्यक्षपदाची चर्चा सुरु झाली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम