मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होणार- जरांगे-पाटील यांचा इशारा

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ मे २०२४ । मराठा आरक्षणाशी संबधित सगेसोयरे आणि मराठा-कुणबी एकच असल्याच्या मुद्यावर ज्यांची साथ मिळेल, त्यांनाच लोकसभा निवडणुकीत निवडून देऊ. ज्यांनी मराठा द्वेष केला, त्यांना मराठा समाज पराभूत करेल. स्वतः निवडून येण्यापेक्षा पराभूत करायला मराठा समाज सरासावला आहे, यातून करेक्ट कार्यक्रम होणार आहे, अशा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी महायुतीचा थेट इशारा दिला आहे.

आम्ही सुरतला गेल्यावर उद्धव ठाकरे भाजपा नेतृत्वाला फोन करून काय म्हणाले?- मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा दावा

सोलापूर शहरासह मंगळवेढा, सांगोला भागात मनोज जरांगे-पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांवर टीकास्त्र सोडले. मराठा आरक्षण प्रश्नावर या नेत्यांच्या चुकांमुळे यंदा लोकसभा निवडणुकीत मोदी यांना महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघातून सभा घेण्याची वेळ आहे. मोदी यांना महाराष्ट्र कळलाच नाही. यात त्यांचा दोष नाही. तर भाजपच्या राज्यातील नेत्यांचा आहे, अशी टीका जरांगे यांनी केली. लोकसभा निवडणुकीत सकल मराठा समाज कोणाला समर्थन दिले नाही वा कोणाला विरोधही केला नाही. परंतु मराठा आरक्षण प्रश्नी सगेसोयरे आणि मराठा-कुणबी एकच असल्याच्या मुद्यावर ज्यांची मदत मिळणार आहे, त्यांच्या बाजूने सकल मराठा समाज उभा राहणार आहे. तर ज्यांनी विरोध करून त्रास देत मराठा समाजाचा द्वेष केला, त्यांना पराभूत करायला मराठे पुढे सरसावतील. हा करेक्ट कार्यक्रम लवकरच दिसेल, असेही मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे यांनी स्पष्ट केले.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम