राज्यात दोन दिवस पावसाचा राहणार मुक्काम !
दै. बातमीदार । ३० मे २०२३ । देशात बदलत्या हवामानाचा फटका महाराष्ट्राल बसण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्रासह इतरही राज्यांमध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, कोकण किनारपट्टीच्या भागात हवेतील आर्द्रतेचं प्रमाण अद्याप कमी न झाल्यामुळे नागरिकांना उन्हाचा आणखी तडाखा सहन करावा लागणार आहे. तर पुढच्या ४८ तासामध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्याने आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.
या सोबतच विदर्भात विविध जिल्हा मध्ये ही जोराचा वार व विजांचा कडकडाट राहणार आहे वाशिम, यवतमाळ, अमरावती ,व वर्धा या जिल्ह्यात सोसाट्याचा वार राहणार आहे याचा वेग हा 30 ते 40की मी प्रती वेगाने वाहणार आहे. या सोबतच विदर्भातील सर्व जिल्हात विजांचा कडकडाट एकला मिळणार आहे.
यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मराठवाडा, विदर्भात पुढच्या ४८ तासांमध्ये पावसाचा जोर पहायला मिळेल. तर यावेळी उकाडा कमी होऊन हवेतील गारवा वाढेल. या आधीच रविवारी भंडारा, गोंदिया, नागपूरसह नजिकच्या भागांध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी गारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांसाठी हा दिलासा आहे.
दरम्यान, देशातल्या राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये सध्या चक्रवातसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील ३-४ तासांत राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि अंदमान निकोबार बेटांवर मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये हलक्या पावसाचे रुपांतर मध्यम पावसात होण्याची दाट शक्यता आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम