या लोकांनी उपास करणे टाळावे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ फेब्रुवारी २०२३ । हिंदू धर्माच्या परंपरेनुसार उपवासाला खूप महत्व दिले जाते. भरपूर लोक नियमित उपवास करीत असतात पण काहीना त्या उपवासाचे मोठे परिणाम भोगावे लागत असतात. काही 3-4 दिवस करतात. यामागे प्रत्येकाची आपापली श्रद्धा आहे. मात्र, उपवासाला केवळ धार्मिकतेचीच जोड नाहीये तर यामागे वैज्ञानिक कारणही तितकंच खरं आहे. आज आम्ही तुम्हाला वेळोवेळी उपवास करता तेव्हा त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो हे सांगणार आहोत. याबरोबरच कोणत्या लोकांनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हेदेखील सांगणार आहोत.
उपवास शरीर शुद्ध करण्याचा एक सुरक्षित आणि प्रभावी मार्ग असू शकतो. शतकानुशतके उपवास शरीराला विषमुक्त करण्याचा आणि आरोग्य सुधारण्याचा मार्ग म्हणून प्रचलित आहे. जर तुम्ही उपवास नीट केला तर तुमची पचनसंस्था चांगली राहू शकते. काही लोकांना उपवास केल्यानंतर ऊर्जा, चांगली मानसिकता आणि मजबूत रोगप्रतिकारक शक्तीचा अनुभव येतो.

‘या’ लोकांनी उपवास करणे टाळावे
जर तुमची वैद्यकीय स्थिती चांगली नसेल आणि तुम्हाला औषधं गोोळ्या घ्याव्या लागत असतील तर तुम्ही उपवास करण्याआधी एकदा नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. खरंतर, उपवास योग्य रित्या न केल्यास किंवा दिर्घ कालावधीसाठी करत राहिल्यास त्याचे काही धोके असू शकतात. ज्या लोकांना शुगर, कमी रक्तदाब आणि काही खाण्यापिण्याच्या काही वैद्यकीय समस्या आहेत अशा लोकांनी उपवास करू नये. ज्या स्त्रिया गरोदर आहेत, स्तनपान करत आहेत किंवा खाण्याच्या अनियमित सवयींचा सामना करत आहेत त्यांनी देखील उपवास करणे टाळावे.

उपवासाचे फायदे काय?
जर तुम्ही योग्य पद्धतीने आणि वैद्यकीय सल्ल्याने उपवास केलात तर तुम्हाला त्याद्वारे अनेक आरोग्यदायी फायदेही मिळू शकतात. या आरोग्य फायद्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे.
वजन कमी करण्यास मदत : उपवास केल्याने कॅलरी कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे वजन कमी होते आणि शरीराची रचना सुधारते.
सुधारित इंसुलिन संवेदनशीलता : उपवासामुळे इंसुलिन संवेदनशीलता सुधारते, जी रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करण्यासाठी आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
हृदयासाठी चांगले : उपवासामुळे रक्तदाब, कॉलेस्ट्रॉलची पातळी आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव सुधारतो, हे सर्व हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम