‘हे’ शेअर देतील ३ वर्षात मोठा फायदा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३ ऑगस्ट २०२३ |  देशभरातील अनेक नागरिकांना शेअर मार्केटमध्ये काम करीत असतात. त्यामुळे प्रत्येक शेअर खरेदी करताना अनेक लोक मोठा विचार करून काम करीत असतात. पण कधी-कधी एखाद्या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअरबद्दल सांगणार आहोत, जो 100 रुपयांवरुन 1000 रुपयापर्यंत वाढला. या शेअरने फक्त 3 वर्षात गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न्स दिले आहे.

आम्ही ज्या शेअरबद्दल बोलत आहोत, तो संरक्षण क्षेत्रातील शेअर आहे. या शेअरने 3 वर्षांच्या कालावधीत 823 टक्के रिटर्न्स दिले. मल्टीबॅगर रिटर्न्स देणाऱ्या कंपनीचे नाव प्रीमियर एक्सप्लोसिव्ह लि.आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली, त्यांना शेअरने मालामाल केले. या शेअरची किंमत 108 रुपयांवरून 1000 रुपयांपर्यंत वाढली.
प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेडच्या शेअरची किंमत 31 जुलै 2020 रोजी 108.55 रुपये होती. तर, आज म्हणजेच गुरुवारी कंपनीचा शेअर 1002.80 रुपयांवर व्यवहार करत आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 3 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर आज त्या व्यक्तीला 9 लाखांपेक्षा जास्त नफा झाला असता.

बीएसईवर 5107 शेअर्समध्ये एकूण 50.83 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 1078 कोटी रुपये झाले. जर आपण स्टॉकच्या पहिल्या तिमाहीच्या कमाईबद्दल बोललो, तर जून तिमाहीत 8.21 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत 1.26 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम