सचिनच्या घराबाहेर करत होते आंदोलन ; बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३१ ऑगस्ट २०२३ | सचिन तेंडुलकरने आपल्या वडिलांना वचन दिल्यामुळे आपण आजपर्यंत पानमसाला, गुटखा, तंबाकू यांच्या जाहिराती केल्या नसल्याचे जाहीरपणे म्हटले आहे. मात्र, तरीही त्याने केलेल्या एका जाहिरातीवरून बच्चू कडू संतप्त झाले आहेत. त्याने ऑनलाईन गेमची जाहिरात केली आहे. या जाहिरातीलाच आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा विरोध आहे.

प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी सचिन तेंडूलकरला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. तरी देखील सचिन तेंडूलकरकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने बच्चू कडू यांनी मुंबईतील सचिनच्या घराबाहेर आंदोलन केले. या वेळी आमदार बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. भारततत्न असलेल्या व्यक्तीने ऑनलाइन गेमची जाहिरात करुन तरुणांमध्ये चुकिचा संदेश देऊ नये, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. या संदर्भात सचिनने ऑनलाइन जाहिरातीतून माघार घ्यावी, नाहीत त्याच्या घरासमोर आंदोलन करु, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता. त्यामुळे सचिन तेंडूलकरच्या विराधोत आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आधीच वर्तवली जात होती. त्यानुसार आजचे आंदोलन झाले. आंदोलनकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले.

या संदर्भात आमदार बच्चू कडू म्हणाले होते की, भारतरत्न असलेले सचिन तेंडूलकर यांनी यावर स्पष्टीकरण दिले पाहीजे. या भारताचा ते अभिमान आहेत. ऑनलाइन गेमच्या जाहिरातीतून त्यांनी माघार घ्यावी. या गेममधून सर्वांची मुक्तता व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या गेममुळे पालकांमध्ये प्रचंड रोष आहे. एकिकडे गेममध्ये पैसे गुंतवू नका अशी जाहिरात करायची आणि तेच दुसरीकडे गेमची जाहिरात करायची, असा दुहेरी धंदा सुरू असल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम