या अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केला इतक्या कोटींचे घर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ एप्रिल २०२३ ।  बॉलीवूड क्षेत्रामधील प्रत्येक अभिनेता असो वा अभिनेत्री प्रत्येकाचे खाजगी आयुष्यात अनेक अडचणीचा सामना करून प्रत्येक व्यक्ती यशस्वी होत असतो त्यातील एक उदाहरण म्हणजे अभिनेत्री आलिया भट बॉलिवूडमधील सध्याची यशस्वी अभिनेत्री आहे. वैयक्तिक असो किंवा प्रोफेशनल आलिया सगळीकडे आलियाचीच जादू आहे.

ती फक्त अभिनेत्रीच नाही तर यशस्वी बिझनेस वुमन आहे. आलियाची कोटींची गुंतवणुक आहे शिवाय तिचे स्वत:चे ‘इटर्नल सनशाईन’ हे प्रोडक्शन हाऊस आहे. ‘एडमम्मा’ हा तिने सुरु केलेला कपड्यांचा ब्रँडही आहे. आता नुकतेच आलियाने मुंबईत आणखी दोन आलिशान फ्लॅट खरेदी केले आहेत. त्यातला एक फ्लॅट तिने बहीण शाहीनला गिफ्ट केला आहे.

आलियाने तिच्या प्रोडक्शन हाऊसच्या नावे बांद्रा वेस्टच्या पाली हिल या ठिकाणी 37.80 कोटींचा एक फ्लॅट खरेदी केला आहे. मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार,IndexTap.com वर दिसत असलेल्या डॉक्युमेंट्सनुसार आलियाने प्रोडक्शन कंपनीच्या माध्यमातून खरेदी केलेला हा फ्लॅट २ हजार ४९७ वर्ग फुट इतका आहे. हा फ्लॅट एरियल व्ह्यू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडमध्ये स्थित आहे. 10 एप्रिल 2023 रोजी ही प्रॉपर्टी रजिस्टर करण्यात आली आणि याच्या स्टॅम्प ड्यूटीची किंमत 2.26 कोटी इतकी आहे.

रिपोर्टनुसार, आलियाने प्राइज सर्टिफिकेटद्वारे शाहीन भटला हे फ्लॅट गिफ्ट केले आहेत. दुसरा फ्लॅट हा जुहू येथील एबी नायर रोडवर गीगी अपार्टमेंट मध्ये आहे. याची किंमत 7.68 कोटी इतकी आहे. याशिवाय आलिया आणि रणबीर कपूरचा कृष्णा राज बंगल्याचं कन्स्ट्रक्शन सुरु आहे. हा आठ मजल्यांचा बंगला असणार आहे. दोघंही याच घरात शिफ्ट होणार आहेत. सध्या आलिया प्रोफेशनल आयुष्यातही व्यस्त आहे. तिने नुकतेच हॉलिवूड डेब्यू केला आहे. ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूडपटात आलिया मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमातही ती रणवीर सिंगसोबत दिसणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम