या जाहिरातीने मोठे ऐतिहासिक काम केले ; शरद पवार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ जून २०२३ ।  जळगाव जिल्हा दौऱ्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार मुक्कामी होते आज ते अमळनेर शहरात सकाळी पोहचत दुपारी पत्रकार परिषद त्यांनी घेतली यावेळी अनेक मुद्यावर पवार बोलले. शिवसेनेनं वर्तमानपत्रांना दिलेल्या जाहिरातीचा वाद राज्यात सुरु असताना ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी देखील यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आणि शिवेसेनेला शेलक्या शब्दांत शालजोडे लगावले आहेत.

पवार म्हणाले, आम्हालाही हे आत्ताचं कळलं की महाराष्ट्राचं हे भाग्य आहे की अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एका व्यक्तीच्या बद्दलचा नावलौकिकाची जाहिरात त्यांच्या कुठल्या हितचिंतकांनी दिली हे आम्हाला माहिती नाही. आमचा समज असा होता की हे जे सरकार बनलं आहे यामध्ये मोठी संख्या ही भाजपची आहे. या जाहिरातीमुळं आम्हा लोकांच्या ज्ञानात भर पडली की, भाजपचं यामध्ये योगदान जास्त नाही अन्य घटकांच आहे. हे महाराष्ट्राला कळवण्याचं ऐतिहासिक काम या जाहिरातीच्या माध्यमातून झालं आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम