‘या’ कंपनीने लाँच केला स्वस्तात मस्त देशी स्मार्टफोन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ सप्टेंबर २०२२ । भारतीय स्मार्टफोन बाजारात चिनी कंपन्यांचा दबदबा असला तरी भारतीय स्मार्टफोन निर्मातेही या कंपन्यांना तगडी टक्कर देण्यास सज्ज झाले आहेत. याकरिता भारतीय स्मार्टफोन निर्माता ‘लावा’ ने त्यांचा ‘लावा ब्लेज प्रो’ हा दमदार स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे.

‘लावा ब्लेज प्रो’ ची वैशिष्ट्ये :-
कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर फोनला ६.५ इंचचा एचडी प्लस डिस्प्ले असून, त्याला ९०Hz चा रिफ्रेश रेट असल्याचे लिहिले आहे.
तसेच फोटोग्राफीसाठी यात बॅक पॅनेलला ५० मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप असण्याबरोबरच सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

३जीबी रॅम असलेल्या या स्मार्टफोनला ६४जीबी इंटर्नल मेमरी आहे, जी मायक्रो एमडी कार्डच्या मदतीने २५६जीबीपर्यंत वाढवता येते. लावा ब्लेज प्रो ची रॅमही एक्सपांडेबल असल्याने तुम्हाला ती ७जीबीपर्यंत वाढवता येईल.

प्रोसेसिंगसाठी यात मीडियाटेक हिलियो जी३७ चिपसेट समाविष्ट करण्यात आला आहे. अँड्रॉइड १२ वर चालणाऱ्या लावा ब्लेज प्रो मध्ये साइड फिंगरप्रिंट सेंसर, फेस लॉक व ५०००एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.

कुठे मिळेल ‘लावा ब्लेज प्रो’?
हा स्मार्टफोन प्रमुख ई-कॉमर्स साईटवरून ₹९,९९९ रुपयांना खरेदी करता येईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम