…हा एकनाथ शिंदे घरात बसणार नाही !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ जुलै २०२३ ।  राज्यात २०१९ च्या सत्तास्थापनेवेळी देवेंद्र फडणवीस यांनी अनुकूल भूमिका घेतली होती, त्यासाठी तुम्हाला ५० कॉल केले; परंतु तुम्ही त्यांना प्रतिसाद दिला नाही. हा कटूपणा, ही तर तुमची झूठनीती होती, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात केला.

कोल्हापूर येथील पेटाळा मैदानावर हा मेळावा झाला. त्यास पाऊस येऊनही कार्यकत्यांची गर्दी झाली होती. व्यासपीठावर पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार मंडलिक, धैर्यशील माने, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रकाश आबिटकर, नरेश म्हस्के आदींची उपस्थिती होती. बाळासाहेबांची शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही-आम्ही सर्वांनी रक्त सांडले आहे. घरावर तुळशीपत्र ठेवून तुम्ही हजारो केसेस अंगावर घेतल्या, म्हणून शिवसेना वाढली आहे. त्यामुळे सत्तेसाठी तडजोड करणार नाही, असे बजावून हा एकनाथ शिंदे घरात बसणारा नाही. नालेसफाईची पाहणी करणारा, जमिनीवरचा मुख्यमंत्री आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. देवेंद्र फडणवीस हे २०१८ मध्येच शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद द्यायला तयार होते; पण ते एकनाथ शिंदे यांना द्यावे लागणार असल्याने उद्धव ठाकरे यांनी ते घेतले नाही, असा गौप्यस्फोटही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम