
या सरकारचा मोठा निर्णय : नागरिकांना होणार अनेक लाभ !
दै. बातमीदार । १ जून २०२३ । कॉंग्रेस पक्षाने कर्नाटक निवडणुकीत मोठे यश संपादन केल्यानंतर आता राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे भाजप व काँग्रेसकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून राजस्थानमध्ये पाचशे रुपयांत सिलिंडर देण्याची घोषणा करण्यात आली होती.
त्यानंतर आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जनतेला आणखीन एक भेट दिली आहे. 100 युनिटपर्यंत विजेचा वापर मोफत करण्यात आला आहे.
अशोक गेहलोत यांनी केलेल्या घोषणेनुसार, राज्यात आता 100 युनिट वापर असलेल्या कुटुंबांना वीज मोफत दिली जाणार आहे. त्यापुढे 200 युनिटपर्यंत एक स्थायी शुल्क आकारले जाणार आहेत. त्यात फ्युएल चार्च व इतर सर्व शुल्क माफ केले जाणार आहे. हे सर्व शुल्क राज्य सरकारकडून भरण्यात येणार आहेत. याचा सर्वाधिक फायदा मध्यमवर्गीय कुटुंबांना होणार आहे, असे गेहलोत यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसने सत्तेत आल्यास 500 रुपयांत सिलिंडर व 100 युनिट पर्यंत वीज मोफत देणार असल्याची घोषणा केली होती. तसेच सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्जही माफ करणार असल्याचे आश्वासन काँग्रेसकडून देण्यात आलेले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम