येणाऱ्या नवीन वर्षात लग्न करण्यासाठी आहेत हे शुभ मुहूर्त !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ डिसेंबर २०२२ । देशात हिंदू धर्मानुसार कोणतेही शुभ कार्य हे मुहूर्त काढूनच केले जाते. लग्नासारख्या गोष्टींसाठी शुभ किंवा अशुभ काळ खूप महत्त्वाचा असतो. हिंदू रितीरिवाजानुसार मंगल मुहूर्तावर कार्य केल्याने वैवाहिक जीवन चांगले जाते. 2023 मध्ये अनेक शुभ मुहूर्त आहेत. हिंदू कॅलेंडरनुसार, वर्षातील काही शुभ मुहूर्त आहेत, ज्या दिवशी लग्न करणे खूप शुभ मानले जाते

2023 मध्ये लग्नासाठी 64 शुभ मुहूर्त
हिंदू कॅलेंडरनुसार 2023 मध्ये लग्नासाठी फक्त 64 शुभ मुहूर्त आहेत. त्यापैकी जानेवारीमध्ये 9, फेब्रुवारीमध्ये 13, मार्चमध्ये 6, मेमध्ये 13, जूनमध्ये 11, नोव्हेंबरमध्ये 5 आणि डिसेंबरमध्ये 7 विवाह शुभ मुहूर्त ठरत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार वर्षात असे चार दिवस आहेत. त्या दिवशी मुहूर्त न पाहाताही लग्न किंवा धार्मिक विधी करता येतो. यात अक्षय्य तृतीया, देवउठनी एकादशी, वसंत पंचमी आणि आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील भडली नवमी यांचा समावेश आहे. दुसरीकडे विवाहासारख्या शुभ कार्यासाठी शुक्र ग्रह उदय स्थितीत असणं आवश्यक आहे. 2023 मध्ये तुमचे लग्न कधी होणार? हे जाणून घ्या.
जानेवारी 2023 – 15, 16, 18, 19, 25, 26, 27, 30, 31
फेब्रुवारी 2023 – 6, 7, 8, 9 10, 12, 13, 14, 15, 17, 22 23, 28
मार्च 2023- 1, 5,6, 9,11, 13
मे 2023 – 6, 8, 9, 10, 11, 15, 16, 20, 21, 22, 27, 29, 30
जून 2023 – 1, 3, 5, 6, 7, 11, 12, 23, 24, 26, 27
नोव्हेंबर 2023 – 23, 24, 27, 28, 29
डिसेंबर 2023 – 5, 6, 7 8, 9, 11, 15

2023 मध्ये ‘या’ महिन्यांत लग्न होणार नाही
एप्रिलमध्ये धनु महिन्यामुळे कोणतेही शुभ कार्य होणार नाही. यासह जून महिन्यापासून चातुर्मास सुरू होईल, त्यानंतर कोणतेही लग्न वगैरे शुभ कार्य 4 महिन्यांनंतरच सुरू होतील
एप्रिल 2023 – या महिन्यात गुरु तारा मावळत आहे. त्यामुळे या संपूर्ण महिन्यात 5 मे पर्यंत फारसे लग्न होणार नाहीत.
जुलै 2023 – जुलै महिन्यात चातुर्मास सुरू होत आहे. या महिन्यापासून भगवान विष्णू पुढील चार महिने योग निद्रामध्ये जातील.
ऑगस्ट 2023- या महिन्यात चातुर्मास सोबतच शुक्र नक्षत्र अस्त करेल.
सप्टेंबर 2023 – या महिन्यात चातुर्मासासह सौर महिना प्रतिबंधित आहे. त्यामुळे शुभ कार्ये वर्ज्य आहेत.
ऑक्टोबर 2023 – या महिन्यात वर्ज्य सौर महिना देखील आहे.
नोव्हेंबर 2023- 22 नोव्हेंबरपर्यंत चातुर्मासामुळे मंगल कार्य सुरुवातीला होणार नाहीत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम