राज ठाकरेंचे हे आहे आवडते नेते ; ठाकरेंनी केला खुलासा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ एप्रिल २०२३ ।  देशात सध्या अनेक नेते पंतप्रधान पदासाठी दावे करीत असतांना पण अनेक चर्चेतून नेहमीच समोर येणारे नाव म्हणजे राष्ट्रवादीतर्फे शरद पवार तर भाजपचे नरेंद्र मोदी हे आहेच. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नुकतेच एका कार्यक्रमात मुलाखत घेताना विचारले असता त्यांनी अजब उत्तरे देवून प्रेक्षकांना शौक दिला आहे.

राज ठाकरेंनी कोणाचं नाव घेतलं?
तसं फार कोणी नाही, कारण मी ज्यांना आजपर्यंत मानत आलो ते बाळासाहेब ठाकरे आहेत. मी आवडण्यापेक्षा दोघांच्या कामाची तुलना करू शकेल. दोघांमध्ये पाहिलं तर कामाला वाघ आहेत. राजकीय मतभेद, भूमिका आवडणं, न पटन हे स्वाभाविक असून याच्यासाठी आपण व्यक्तीवरती फुल्या मारत नाही. ज्यावेळेला मी नरेंद्र मोदींवर टीका करत होतो, ती त्या व्यक्तीवरची नाहीतर त्यांनी घेतलेल्या भूमिकेवरची होती. तेच पवारांवर टीका करताना त्या व्यक्तिच्या भूमिकेवरती टीका करत असतो. मी कोणत्याही व्यक्तीवर टीका करताना त्यामध्ये मी माझं 100 टक्के टाकलेलं असतं, असं राज ठाकरे म्हणाले. मी नाशिकला काम करून दाखवलं, निवडणुकीमध्ये यश नाही आलं हा भाग सोडा. माझा जन्म मुंबईमध्ये झाला वाढलो मुंबईमध्ये पण माझं खरंच प्रेम हे महाराष्ट्रावर आहे. विनाकारण सांगत नाही पण माझी ती श्रद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपली ओळख आहे, त्या महाराष्ट्राबद्दल आपण अभिमान बाळगणं, प्रेम असतं दुसरं काय असू शकतं, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. मी राजकारणामध्ये अपघाताने आलोय. माझं पहिलं पॅशन हे फिल्म मेकिंग असल्याचंही ठाकरेंनी सांगितलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम