दै. बातमीदार । ४ जून २०२३ । ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आयसीसीने अधिकृत वेबसाइटवर शनिवारी ही माहिती शेअर केली. तो जानेवारी २०२४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी कारकिर्दीतील घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळणार आहे.
त्याआधी वॉर्नर भारताविरुद्ध डब्ल्यूटीसी फायनल आणि इंग्लंडविरुद्ध अॅशेस मालिका खेळणार आहे. वॉर्नर सध्या इंग्लंडमध्ये असून, तो डब्ल्यूटीसी फायनलची तयारी करीत असल्याचे आयसीसीने म्हटले आहे. वॉर्नर म्हणाला, ‘२०२४ च्या टी-२० विश्वचषकात माझ्या कारकिर्दीचा शेवट होईल. डब्ल्यूटीसी आणि अॅशेस मालिकेनंतर पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत मी अखेरचा सामना खेळेन.’ वॉर्नरने १०२ कसोटी सामन्यांमध्ये ८१५८ धावा केल्या आहेत. यादरम्यान तीन द्विशतके २५ शतके आणि ३४ अर्धशतके झळकावली. त्याची सर्वोत्तम खेळी ३३५ धावा इतकी आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम