देशातील हा रेल्वे मार्ग आजही आहे इंग्रजांच्या ताब्यात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ मार्च २०२३ । देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष उलटून गेली आहेत. आपण नुकताच आपला 75 स्वातंत्र दिन साजरा केला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लोक झटले, तर अनेकांनी आपल्या प्राणाची आहूती देखील दिली. त्यानंतर अखेर जेव्हा ब्रिटीशांना पर्याय उरला नाही, तेव्हा त्यांना आपल्या देशात परतून जावं लागलं. भारतात अशा अनेक इमारती आणि गोष्टी आहेत ज्या इंग्रजांनी तयार केलेल्या आहेत. हे तर सगळ्यांना माहित आहे. पण जेव्हा इंग्रज गेले, तेव्हा मात्र त्यांच्या सगळ्या इमारती आणि गोष्टी सगळंच ते भारतात सोडून गेले.

इंग्रजांनी बनवलेले रेल्वेमार्गांचा आपण आजही वापर करतो. पण तुम्हाला माहितीय का की देशात असा एक रेल्वे मार्ग आहे, जो अजूनही भारत सरकारच्या अखत्यारीत नसून इंग्रजी कंपनीच्या अखत्यारीत आहे. आता तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल की अरे, असा कोणता रेल्वे मार्ग आहे किंवा अशी कोणती जागा आहे?

चला याबद्दल जाणून घेऊ. हा रेल्वे मार्ग महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात आहे. जेथे शकुंतला रेल्वे मार्गावर एकच ट्रेन धावत असली तरी त्याबदल्यात ब्रिटनला दरवर्षी लाखो रुपये दिले जातात. ब्रिटीश काळात, या ट्रॅकवरील गाड्या ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेद्वारे चालवल्या जात होत्या. स्वातंत्र्यानंतर सुमारे ७० वर्षांनी रेल्वेचे राष्ट्रीयीकरण झाले मात्र या मार्गाकडे दुर्लक्ष करण्यात आले. अशा प्रकारे, हा ट्रॅक अजूनही सेंट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी या ब्रिटनच्या खाजगी कंपनीच्या अंतर्गत आहे. आता त्यावर फक्त एकच ट्रेन चालते, तिचे नाव शंकुतला पॅसेंजर. या ट्रेनच्या नावावरून ट्रॅकचे नावही प्रसिद्ध झाले.

दरवर्षी करोडोंची रॉयल्टी भारतीय रेल्वे या ट्रॅकचा वापर ट्रेन चालवण्यासाठी करते, त्यामुळे दरवर्षी सेंट्रल प्रोव्हिन्सेस रेल्वे कंपनीला करोडो रुपयांची रॉयल्टी दिली जाते. मात्र, पैसे घेऊनही ब्रिटिश कंपनी या ट्रॅकची दुरुस्ती किंवा देखभाल करत नाही. भारत सरकार याचा संपूर्ण मेन्टेनंन्स सांभाळते. अनेकवेळा ही लाईन विकत घेण्याचा प्रयत्नही करण्यात आला मात्र काहीही निष्पन्न झाले नाही.लोकांसाठी यवतमाळ ते अचलपूर प्रवासाचे रेल्वे हे एकमेव साधन आहे आणि शकुंतला पॅसेंजर हा एकच पर्याय आहे. त्यामुळे रेल्वेचे कामकाजही थांबलेले नाही. ट्रेन कुठे बनवली होती? ही ट्रेन 1921 मध्ये मँचेस्टर, यूके येथे तयार करण्यात आली होती. ते जवळपास 70 वर्षे जुन्या इंजिनने चालवले जात होते. तथापि, 1994 मध्ये इंजिन बदलले आणि डिझेल इंजिन झाले. शकुंतला रेल्वे लाईन टाकण्याचे काम 1903 मध्ये सुरू झाले. अमरावती ते मुंबई बंदरापर्यंत कापूस उचलण्यासाठी हा ट्रॅक बांधण्यात आला होता. 13 वर्षांनंतर म्हणजेच 1916 मध्ये हा ट्रॅक पूर्ण झाला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम