देशातील या राज्याने दिले महिलांना बसचा प्रवास मोफत !
दै. बातमीदार । २२ मे २०२३ । महाराष्ट्र सरकारने महिलांना बसच्या प्रवासात मोठी सूट दिल्यानंतर आता कर्नाटक सरकारने मोठी घोषणा केली आहे. यात महिलांना बसचा प्रवसा फुकट असल्याने आता त्यांना विनातिकीट प्रवास करता येणार आहे. सरकारने याबाबत मोठी घोषणा केली आहे. या सेवेचा लाभ तुम्हाला घेता येणार का आणि यासाठी नेमकी काय अट ठेवली आहे पाहा. जनतेनं आम्हाला बहुमत दिल्याने आमचं सरकार आलं आता 5 महत्त्वाची आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे असं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.
आम्ही जनतेला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत असं सिद्धरामय्या म्हणाले आणि त्यांनी आपण केलेल्या घोषणा आता प्रत्यक्षात आणत असल्याचे यावेळी दाखवूनही दिलं. 20 मे रोजी झालेल्या कर्नाटक मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयात महिलांना अनेक सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. 20 मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सर्व महिलांना राज्य मार्ग परिवहन बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शक्ती योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ, बंगळुरू महानगर परिवहन महामंडळ, उत्तर पश्चिम कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळ, कल्याण कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळ या चार वाहतूक संस्थांनी राज्य शक्ती योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिलांना तत्वत: मान्यता दिल्याचं सांगण्यात आले आहेत. या संबंधित असलेलं नियम आणि अटी लवकरच जारी केल्या जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकारने पाच हमीभावांसाठी आदेश जारी केला असून पुढील मंत्रिमंडळ बैठकीत हमीभावाच्या अटींना अंतिम स्वरूप दिले जाईल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम