अवघ्या २४ तासात कोरोनाचे देशात हजारो रुग्ण !
दै. बातमीदार । १९ एप्रिल २०२३ । सण २०१९ मध्ये जगभर कोरोनाचे थैमान सुरु झाले होते. त्यानंतर पुन्हा आता एकदा देशात कोरोनाची दहशत बसू लागली आहे. संसर्गाच्या झपाट्यानं लोकांची चिंताही वाढली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या बुधवारच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10,542 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे कालच्या तुलनेत 38 टक्क्यांनी अधिक आहेत. त्यामुळं सक्रिय रुग्णांची संख्या 63,562 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत या जीवघेण्या विषाणूमुळं 38 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
ताज्या आकडेवारीनुसार, भारतात संसर्गाचा दैनंदिन दर 4.39 टक्के आहे, तर साप्ताहिक दर 5.1 टक्के आहे. सध्या देशात 63,562 लोक कोरोना विषाणू संसर्गावर उपचार घेत आहेत, जे एकूण प्रकरणांपैकी 0.14 टक्के आहे.
Covid19 | 10,542 new cases in India today; Active caseload at 63,562 pic.twitter.com/E93TDkdWlx
— ANI (@ANI) April 19, 2023
भारतातील रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.67 टक्के आहे. आतापर्यंत देशात एकूण 4,42,50,649 लोक संसर्गमुक्त झाले आहेत, तर कोविड-19 मुळं मृत्यूचं प्रमाण 1.18 टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, भारतातील देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत अँटी-कोविड-19 लसींचे 220,66,27,758 डोस देण्यात आले आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम