मुंबईला हवाई हल्ल्याच्या धमकी ; सुरक्षा व्यवस्था कडक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ जानेवारी २०२३ । देशात गेल्या दोन महिन्यापासून देशाचे पंतप्रधान यांच्यासह मोजके शहराला हल्याच्या धमकी येत होत्या आता पुन्हा येत्या २६ जानेवारी रोजी मुंबईवर हवाई हल्ल्या केला जाऊ शकतो, ही बाब लक्षात शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. संभव्या हल्ला लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून दादरच्या शिवाजी पार्कला नो फ्लाय झोन घोषित करण्यात आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांना असे 26 जानेवारीला शिवाजी पार्कवर हवाई हल्ला होणार असल्याचे इनपुट मिळाले आहेत. त्यानुसार सुरक्षेचा उपाय म्हणून या क्षेत्राला नो फ्लाय झोन घोषित करण्यात आले आहे. दुसरीकडे, प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव उप-पारंपारिक हवाई उड्डाणांवर दिल्लीत बंदी घातली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीत पॅरा-ग्लाइडर्स, पॅरा-मोटर, हँग-ग्लाइडर्स, यूएव्ही, यूएएस, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, रिमोटली पायलट एअरक्राफ्ट, हॉट एअर बलून, लहान पॉवर एअरक्राफ्ट यासारख्या हवाई वाहनांना परवानगी नसेल असे आदेश दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी जारी केले आहेत

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम