राज्यातील कॉंग्रेस आमदाराला जीवे मारण्याची धमकी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ एप्रिल २०२३ ।  राज्यातील भाजप व शिंदे गट सत्तेवर आल्यापासून राज्यातील राजकारणाने वेगळे वळण घेतले आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणूका देखील सुरु आहेत. या निवडणुकीत काही जिल्ह्यात भाजप व शिंदे गट एकत्रित लढत जरी असला तरी राष्ट्रवादीचा छुपा पाठिबा असल्याने राजकारण चर्चेत येत आहे. तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील एका कॉंग्रेसच्या आमदाराला जीवे मारण्याचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे.

नाशिकमध्ये बाजार समिती निवडणुकीतल्या प्रचारावरून काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांना शिंदे गटाच्या चुंबळे पिता-पुत्राकडून धमकीचे फोन आलेत. त्यामुळे खोसकर यांनी उद्विग्न होत चक्क आत्महत्या करण्याचा इशारा दिला. यावेळी त्यांना रडू आवरले नाही. या प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हिरामण खोसरकर यांनी या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. खोसकर हे सध्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार आहेत. मात्र, आमदार खोटे बोलत आहेत. ते कलाकारांपेक्षा मोठे आहेत. उलट त्यांनी आमच्या उमेदवाराला धमकावले, असे म्हणत चुंबळे पिता-पुत्रांनी हे आरोप फेटाळून लावलेत.

काय आहे प्रकरण ?
नाशिक जिल्ह्यात बाजार समिती निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. येथे दोन पॅनल रिंगणात आहेत. त्यात महाविकास आघाडीकडून माजी खासदार तथा माजी सभापती देविदास पिंगळे यांचे पॅनल मैदानात आहे. तर शिंदे गटाकडून माजी सभापती शिवाजी चुंभळे निवडणुकीत उतरलेत. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी देविदास पिंगळे यांच्या पॅनलचा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळेच ही धमकी देण्यात आल्याचा आरोप हिरामण खोसकर यांनी केला आहे. शिवाजी चुंभळे यांचे पुत्र अजिंक्य चुंभळे यांनी फोनवरून धमकी दिल्याची तक्रार खोसकर यांनी केली आहे. या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

दोन कोटी खर्च करून तुला निवडणुकीत पाडेन. आमच्या वडिलांच्या नादी लागलास, तर भयंकर परिणाम होतील, अशी धमकी शिवाजी चुंभळे यांचे पुत्र अजिंक्य चुंभळे यांनी दिल्याचे हिरामण खोसकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. आधी धमकीचे फोन आल्याने मी चुंभळेंना ब्लॉक केले. मात्र, नंतर अनोळखी नंबरवरून फोन आला. असे होत असेल, तर गरिबांनी राजकारणातच उतरायचे नाही का, ही कसली लोकशाही. ही हुकूमशाही झाली. हे माझा अपघात करतील. हातपाय मोडून जाण्यापेक्षा मी स्वतःच माझे जीवन संपवेन असा उद्विग्न इशाराही खोसकर यांनी यावेळी दिला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम