पंतप्रधान मोदी यांना धमकी ; मुंबई पोलिसांना मेसेज !
दै. बातमीदार । २२ नोव्हेबर २०२२ मुंबई पोलिसांना व्हॉटसअॅप मेसेज आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या हत्येचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने कट रचल्याचा आलाय. त्यामुळे खळबळ उडालीय. मोदींना यापूर्वीही ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. एकीकडे भारत जोडो यात्रा करणाऱ्या राहुल गांधी यांना धमकी देण्यात आल्याची बातमी नुकतीच आली होती. त्यानंतर आता पंतप्रधान मोदीही टार्गेटवर असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरू केलाय.
मुंबई पोलिसांना पाठलेल्या ऑडिओमेसेजमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने कट रचला आहे. त्यासाठी त्याने मुस्ताक अहमद आणि मुस्ताक या दोघांना पंतप्रधानांच्या हत्येची सुपारी दिलीय. या मेसेजमुळे एकच खळबळ उडालीय.
मुंबई वाहतूक पोलिसांना हा मेसेज आला आहे. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केलाय. मेसेज पाठवणाऱ्याचा शोध सुरू केलाय. पंतप्रधान मोदींना यापूर्वीही अशी जीवे मारण्याची धमकी आलीय. त्यामुळे पोलिस अधिक दक्ष झालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावर्षी ऑगस्ट महिन्यातही ठार मारण्याची धमकी आली होती. तसा मेल ‘एनआयए’ला आला होता. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्यासाठी 20 स्लीपर सेल तयार आहेत. त्यांच्याकडे 20 किलो आरडीएक्स आहे, असे म्हटले होते. शिवाय ई-मेल पाठवणाऱ्याने आपले दहशतावद्यांशी संबंध आहेत. या कटाचा खुलासा होऊ नये म्हणून आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर हा मेसेज आल्याने पोलिस हादरून गेलेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम