दै. बातमीदार । ५ एप्रिल २०२३ । देशात गेल्या काही महिन्यापासून मोठ्या नेत्यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या येत असतांना आता पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं प्रकरण समोर आलंय.
नोएडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. पोलिस स्टेशन सेक्टर-20 मध्ये एका वृत्तवाहिनीच्या अधिकाऱ्यानं तक्रार नोंदवलीये. या घटनेची नोंद करून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी नोएडा पोलिसांना महत्त्वाचा पुरावा मिळालाय. लवकरच या प्रकरणाचा खुलासा केला जाईल, असा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केलाय. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही जणांची चौकशी सुरू केली आहे.
सहायक पोलिस आयुक्त रजनीश वर्मा म्हणाले, सेक्टर 16-ए येथील एका वाहिनीचे व्यवस्थापक विजय कुमार यांनी पोलिसांकडं तक्रार करताना सांगितलं की, ‘त्यांच्या कंपनीचे सीएफओ कुशन चक्रवर्ती यांना अज्ञातानं ई-मेल पाठवला आणि त्यात देशाच्या पंतप्रधानांसह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी दिली.’ पोलीस या प्रकरणाच्या अगदी जवळ पोहोचले असून, लवकरच याचा खुलासा केला जाईल, असा दावा त्यांनी केलाय. सायको व्यक्तीनं किंवा प्रेमात अपयशी ठरलेल्या व्यक्तीनं असा मेल केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम