टायगर इंटरनॅशनल स्कूल येथे सांस्कृतिक गणेश विसर्जन उत्साहात

बातमी शेअर करा...

पारोळा दि 14 रोजी

येथील आई सत्यभामा फाऊंडेशन संचलित टायगर इंटरनॅशनल स्कूल मध्ये संस्थेचे संचालिका सत्यभामा पाटील, संचालक,पांडुरंग पाटील यांच्यातर्फे विसर्जन दिनी विद्यार्थ्यांसाठी भजनाचे आयोजन करण्यात आले.

भजन मंडळी यांनी गणपती विशेष सर्व विद्यार्थ्यांन कडून भजन गाऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. तसेच, टायगर इंटरनॅशनल स्कूल चे चेअरमन रवींद्र पाटील, संचालिका रूपाली पाटील यांच्या हस्ते सत्यनारायण पुजा संपन्न झाली, त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी प्रसादाचा लाभ घेत वाजत गाजत बाप्पाची विर्सजन मिरवणुक निघाली.

 

आपल्या बाप्पाचे विर्सजन करतांना मुलांचे डोळे पाणावले पण क्षणातच “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या।” या । पुढच्या वर्षी लवकर येणार ह्या कल्पनेन मुले झाली आनंदाने बाप्पाच्या विसर्जनात सहभागी झाले.

 

या प्रसंगी टायगर इंटरनॅशनल स्कूल चे चेअरमन रवींद्र पाटील संचालिका रूपाली, प्राचार्य श्रीनिवास राव, अजिम शेख उपप्राचार्य कविता सूर्यवंशी तसेच ऍडमिनिस्टेड विश्वास पाटील, विभाग प्रमुख नम्रता बेडीस्कर , वृषाली पाटील, शितल अकॅडमी चे प्राचार्य मंगेश खैरनार,

क्लार्क श्रीकांत खैरनार, अभिषेक सिंग आणि सर्व शिक्षिका, कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम