डिजिटल युगासोबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवा, आजच ध्येय ठरवा आणि जीवनात उंच भरारी घ्या

लोकनायक सरपंच भैय्यासाहेब रोकडे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

बातमी शेअर करा...

पारोळा : टायगर इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून करंजी गावाचे सरपंच भैय्यासाहेब रोकडे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य पी. एस. पाटील यांच्या स्वागत व प्रस्ताविक भाषणाने झाली. त्यानंतर अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर संदेश दिला आणि करंजी गावाचे सरपंच भैय्यासाहेब रोकडे यांना लोकनायक सरपंच सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

मार्गदर्शन करताना भैय्यासाहेब रोकडे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले –
“आजच आपले ध्येय निश्चित करा आणि जीवनात उंच भरारी घ्या.”
तसेच त्यांनी आवाहन केले की, “डिजिटल युगासोबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवा.”

त्यांनी स्पष्ट केले की, फक्त पुस्तकी शिक्षणावर मर्यादित न राहता व्यावहारिक ज्ञान, तंत्रज्ञानाचे भान व जीवनमूल्यांची जाण असणे तितकेच आवश्यक आहे. त्यांच्या प्रभावी विचारांनी विद्यार्थ्यांच्या मनात उत्साह, आत्मविश्वास आणि सकारात्मकता संचारली.

कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन योगेश पाटील व नम्रता बेडीस्कर यांनी केले.

या प्रसंगी प्राचार्य पी. एस. पाटील, अजीम शेख, उपप्राचार्या कविता सूर्यवंशी, विभाग प्रमुख नम्रता बेडीस्कर, वृषाली पाटील, काजल सिंधी, क्लार्क श्रीकांत खैरनार तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, प्रेरणा व आत्मविश्वासाचा अमूल्य ठेवा ठरला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम