राज्यात दंगली घडवायच्या ; राऊतांची घणाघाती टीका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ मार्च २०२३ ।  राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतांना सत्ताधारीसह विरोधक एकमेकावर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत भाजपसह शिंदे गटावर घणाघाती टीका केली आहे. महाराष्ट्रातील वातावरण बिघडवायचे. दंगली घडवायच्या आणि मग निवडणुकांना सामोरे जायचे. सध्या पडद्यामागे याबाबत पटकथा लिहिणे सुरु आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मुंबई विद्यापीठ, न्यायलय, सीबीआय, ईडी यांच्यावर किती विश्वास ठेवायचा अशी आज परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांचीच दुकानदारी. सगळ्या यंत्रणा सत्तेच्या टाचेखाली काम करतात. सुरतच्या राहुल गांधींच्या निकालावरुन हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन नेते गुरुवारी (23 मार्च) एकत्र विधानभवनात आले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. विधिमंडळ परिसरात दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. त्यानंतर दोघेही नेते हसत हसत विधानभवनात गेले. याबाबत संजय राऊत म्हणाले, विधानसभेत जाण्याचा रस्ता एकच आहे. त्यामुळे युतीच्या केवळ अफवा आहेत. संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या भाषणावर टीका केली आहे. ते म्हणाले, राज ठाकरेंचे भाषण सगळे काही स्क्रिप्टेड होते. आम्हाला बाहेरुन सलीम जावेद लागत नाही. आमचा पक्ष स्वतःच्या पायावर समर्थपणे उभा आहे.

संजय राऊत म्हणाले, भ्रष्टाचार एकाच पक्षाचा नसतो. सत्तेत असलेल्यांचा तो जास्त असतो. मात्र विरोधकांच्याच चुका शोधून काढल्या जातात. नरेंद्र मोदी म्हणतात सध्या अमृतकाळ सुरु आहे. सूड आणि बदल्याचे राजकारण हाच त्यांचा अमृतकाळ आहे. लोकशाहीचा कणा मोदींनी मोडून काढला. राहुल गांधी यांना ज्यासाठी शिक्षा झाली ते प्रकरण नरेंद्र मोदी यांच्या बदनामीविरोधातील आहे. तर नरेंद्र मोदी यांनी खटला दाखल करायला हवा होता. संजय राऊत म्हणाले, ज्याप्रकारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला पाठिंबा मिळत आहे त्यामुळे भाजप आणि त्यांची बगलबच्ची हादरली आहे. आमच्यासाठी सामना करायचे तर जातीय तेढ निर्माण करायचे, आणि निवडणुका घ्यायच्या. मात्र या पटकथेला जनमाणसात स्थान मिळणार नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम