टीम इंडियासाठी आजचा दिवस महत्वाच ; होणार मोठी घोषणा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २१ ऑगस्ट २०२३ | क्रिकेटच्या मैदानात आशिया कपची घोषणा झाली असून आजचा दिवस टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी महत्त्वाचा दिवस असून आशिया कपसाठी टीमची घोषणा होण्याची शक्यता आहे. आशिया कपसाठी टीम इंडियाची आज घोषणा होणार आहे. दुपारी 1.30 पर्यंत टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड देखील उपस्थित राहणार आहेत.वर्ल्ड कपआधी आशिया कप घेऊन येण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. आशिया कपसाठी निवड झालेल्या खेळाडूंना वर्ल्ड कपमध्येही खेळण्याची संधी मिळणार हे निश्चित झाले आहेत.आशिया कपसाठी केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांची निवड टीममध्ये केली जाणार आहे. जसप्रीत बुमराहने आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळून तंदुरुस्त असल्याचं सिद्ध केलं. आशिया कपसाठी त्याची निवड होणार असल्याचा कयास लावला जात आहे.प्रसिद्ध कृष्णाचीही आशिया कपसाठी निवड होऊ शकते.

निवड समिती 17 खेळाडूंची निवड करणार आहे. मात्र, वर्ल्ड कपसाठी केवळ 15 खेळाडूंची निवड केली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे युजवेंद्र चहलचं टीम इंडियातील स्थान डळमळीत झालं आहे.आशिया कपसाठी युजवेंद्र चहलला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. तर त्याच्या जागी टिळक वर्माची निवड केली जाण्याची शक्यता आहे. टिळक वर्मा आशिया कपमध्ये गेम चेंजर ठरू शकतो असं त्याच्या मागच्या काही सामन्यांवरुन कयास लावला जात आहे. सिराज आणि शमी टीममधून खेळण्याची शक्यता आहे.शार्दूल आणि प्रसिद्ध कृष्णा या दोघांमध्ये कोणाला संधी दिली जाणार हे पाहावं लागणार आहे. जडेजाला ऑलाउंडर म्हणून घेतलं जाईल तर कुलदीप यादव मुख्य स्पीनर म्हणून असेल असं आता सांगितलं जात आहे. आज दुपारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार असून सर्वांचं लक्ष टीम इंडियात कोणाची निवड होणार याकडे लागलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम