आज होणार राहुल गांधींना खासदारकी बहाल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ ऑगस्ट २०२३ | कॉंग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही महिन्यापासून मोठ्या अडचणीत वाढ झालेली असतांना आज त्यांना पुन्हा एकदा लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल होण्याची शक्यता आहे. त्यासाठीची सर्व आवश्यक कागदपत्रे गृह सचिवालय सोमवारी पडताळून पाहणार आहे. त्यानुसार लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे याबाबत निर्णय घेतील. त्यामुळे राहुल गांधींच्या खासदारकीची चावी ओम बिर्ला यांच्या हाती असणार आहे.

राहुल गांधींना लोकसभा सदस्यत्व बहाल व्हावे यासाठी पुढची रणनीती आखण्याच्या दृष्टीने काँग्रेसने आज  सकाळी 10.30 वाजता बैठक बोलावली आहे. इंडिया आघाडीतील सर्व विरोधी पक्ष या बैठकीत सहभाग घेण्याची शक्यता आहे. राहुल गांधींना सदस्यत्व बहाल करण्याच्या मुद्दय़ावरून चालढकल होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सभागृहात हा विषय जोरकसणे मांडण्यासाठी या बैठकीत विविध मुद्दय़ांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांना लोकसभा सदस्यत्व लवकरात लवकर बहाल करण्यात यावे यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे सचिवालयाला शनिवारी सकाळीच सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले त्याच प्रकाशवेगाने त्यांना ते पुन्हा बहाल करायला हवे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम