आजचे राशिभविष्य दि १५ ऑगस्ट २०२३

बातमी शेअर करा...

बातमीदार | १५ ऑगस्ट २०२३ | मेष : आज मोठ्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. धीर ठेवून हातातील काम पूर्ण करा. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. त्यांच्यासोबत वेळ व्यतित करा. एखाद्या प्रतिष्ठीत व्यक्तीची भेट आज होऊ शकते. त्यामुळे करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. आपल्या जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवाल. काही सकारात्मक बातम्या कानावर पडतील.

वृषभ: आध्यात्मिक दृष्टीकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा ठरेल. गरजू व्यक्तींची मदत करण्याचा योग जुळून येईल. चांगल्या कामांसाठी वेळ लागतो. त्यामुळे शांतपणे काम करत राहा. योग्यवेळी तुम्हाला त्याचं फळ मिळेल. आपल्यासोबत एखादी दैवी शक्ती कार्यरत असल्याची अनुभूती होईल. तुमच्या शब्दाला मान मिळेल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात प्रगती दिसून येईल.
मिथुन: आजचा दिवस एकदम आनंदात जाईल. नातेवाईक घरी आल्याने एकदम उत्साह दिसून येईल. गप्पागोष्टींमुळे रोजचा ताण कमी होईल. तसेच काही महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत होईल. कामाचा ताण कमी झाल्याने आत्मविश्वास दुणावेल. तसेच नवीन काम करण्याची ऊर्जा मिळेल. पार्टनरशिपच्या धंद्यात यश मिळू शकते.

कर्क: आज दिवसभर कसलीतरी चिंता सतावत राहील. उगाचच धडधड वाढेल. नेमकं काय कारणाने होतंय असा प्रश्न पडेल. त्यामुळे दिवसभर नामस्मरणात वेळ व्यतीत करा. हनुमान चालीसेचं पठण करा. कुलस्वामिनी आणि कुलदेवाची पूजा करा आणि आलेलं संकट दूर करण्याचं साकडं घाला.

सिंह: आज दिवसभर चेहरा एकदम प्रसन्न राहील. त्याचा थेट सकारात्मक परिणाम कामावर दिसून येईल. इतकंच काय गेल्या काही दिवसांपासून असलेलं आर्थिक संकट कमी होईल. तसेच आरोग्यविषयक तक्रार दूर झाल्याने दिलासा मिळेल. नोकरी शोधात असलेल्या जातकांना नोकरी मिळू शकते. प्रेमप्रकरणात अपेक्षित यश मिळेल.

कन्या: आजचा दिवस या राशीच्या जातकांना संमिश्र असा जाईल. काही ठिकाणी यश तर काही ठिकाणी अपयशाचा सामना करावा लागेल. त्यामुळे चिडचिड होईल. उगाचच घरच्यांवर राग काढण्याच्या भानगडीत पडू नका. आत्मविश्वासाने आलेल्या अपयशाला सामोरं जा. यामुळे प्रश्न लवकर सुटतील.

तूळ: आज कुटुंबासोबत बाहेर फिरण्याचा योग जुळून येईल. पण लांबचा प्रवास शक्यतो टाळा. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. सध्याची तापाची साथ असून मुलांची काळजी घ्या. व्यवसायात काही नवीन घडामोडी घडतील. त्यामुळे दिवसभर व्यस्त राहाल. व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढा आणि कुंटुंबासोबत राहा.

वृश्चिक: कामानिमित्त जवळचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. आपल्याला दिलेलं काम वेळेत पूर्ण होईल. तसेच आपलं कौशल्य पाहून समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडेल. समाजात मानसन्मान वाढेल. नातेवाईकांकडून आनंदाची बातमी कानावर पडू शकते.

धनु: आपला स्वभाव चांगला असला की कितीही संकट आलं की ते चुटकीसरशी दूर होतं. त्यामुळे स्वभावात बदल करा आणि पाय जमिनीवर ठेवून वागा. अहंकारात नुकसान होतं हे लक्षात ठेवा. गरजू आणि गरीब व्यक्तींची मदत करा. जोडीदारासोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतो.

मकर: आज दिवसभर काही ना काही कारणावरून मूड स्विंग होऊ शकोत. आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढेल. त्यामुळे दिवसभरातील वेळापत्रक विस्कटून जाईल. लांबचा प्रवास करणं टाळा. शक्यतो सार्वजनिक वाहनातून प्रवास करणं योग्य राहिल. विनाकारण पैसा खर्च होऊ शकतो. त्यामुळे आर्थिक गणित विस्कटून जाईल.

कुंभ: योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचा सल्ला वडिलधाऱ्या व्यक्तींकडून मिळेल. त्यामुळे डोकं वेगळ्याच दिशेने काम करण्यास सुरुवात करेल. पुढील योजनांसाठी आतापासूनच पायाभरणी करण्यास सुरुवात होईल. मुलांच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून काही योजना आखाल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील आणि उत्तम भोजनाचा आनंद घ्याल.

मीन: दिवसभर तुमच्यावर कसलीतरी जबाबदारी राहील. त्यामुळे संपूर्ण दिवस तणावपूर्ण राहील. गुप्त शत्रूंकडून त्रास होऊ शकतो. न्यायालयीन प्रकरण नकोसं वाटेल. कोणत्याही कागदपत्रांवर सही करताना ते वाचा. घाईगडबडीत कोणतंही पाऊल उचलू नका. पैसे खर्च करताना योग्य कामासाठी आहेत का याची शहनिशा करा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम